जि. प. प्राथमिक शाळा काळसे, धामापूर येथे विद्यार्थी गुणगौरव आणि माजी विद्यार्थी मेळावा संपन्न

चौके (प्रतिनिधी) : ऋणानुबंध माजी विद्यार्थ्यांचा या उपक्रमाअंतर्गत शुक्रवार दिनांक 8 मे रोजी जि. प. प्राथमिक शाळा काळसे, धामापूर येथे शाळेत शिकून गेलेल्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा माजी विद्यार्थी संस्थेचे अध्यक्ष संतोष सावंत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी माजी विद्यार्थी तथा काळसे धामापूर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी विनोद गोसावी, सिव्हिल इंजिनियर तसेच काळसे धामापूर शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष योगेश राऊळ, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा स्वप्नाली गोसावी, अनघा गोसावी, मुख्याध्यापिका माधुरी फुंडे, माजी विद्यार्थी घनश्याम नाईक, राजेंद्र गोसावी, संजय गोसावी, मंगेश मालवणकर, राजन मालवणकर, माधव नाईक, केशव नाईक, प्रमोद नाईक, राजन नाईक, नारायण मयेकर, चंद्रशेखर नाईक, विश्वनाथ नाईक, लक्ष्मण सावंत आणि स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी या शाळेचे गुणवंत विद्यार्थी कु. अथर्व अमोल गोसावी आणि कुमारी किमया जितेंद्र गोसावी या दोघांना STS, DCA, गुरुकुल अशा स्पर्धा परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल प्रशालेच्या वतीने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मेडल, सन्मानचिन्ह देऊन गुणगौरव करण्यात आला. तसेच शाळेच्या आत्यवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन केले याला उपस्थित माजी विद्यार्थी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच शाळेमध्ये विद्यार्थीसंख्या वाढण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत अशी इच्छा व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेच्या शिक्षिका माधुरी फुंडे यांनी केले व उपस्थितांचे आभार मानले.

error: Content is protected !!