अवैधरित्या वास्तव्यास असलेल्या ५ बांगलादेशी महिलांवर फरासखाना पोलिसांची कारवाई
पुणे (प्रतिनिधी) : पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अवैद्यरित्या वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी महिला व पुरुषांचा शोध घेवून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते. त्यानुसार फरासखाना पोलीस स्टेशनचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांनी तपास पथकातील अधिकारी, कर्मचारी तसेच ए.टी.सी. कर्मचाऱ्यांना बांगलादेशी नागरिकांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या.
या आदेशानुसार दिनांक ११ मे २०२६ रोजी रात्री १.०० वा. ते सकाळी ९.०० वा. दरम्यान बुधवार पेठेतील रेड लाईट एरियामध्ये कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. या कारवाईदरम्यान अवैधरित्या भारतात वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी महिलांचा शोध घेत असताना पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे यांना गोपनीय माहिती मिळाली. बुधवार पेठेतील माचिस बिल्डिंग येथे पाच बांगलादेशी महिला वास्तव्यास असून त्या विना परवाना अवैधरित्या भारतात आल्याची खात्रीशीर माहिती त्यांना प्राप्त झाली.
सदर माहिती फरासखाना पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी प्रशांत भस्मे यांना कळविण्यात आली. त्यांच्या आदेशानुसार पोलीस हवालदार सुनिल मोरे, महेश राठोड, वशिम शेख, महिला पोलीस हवालदार राणी शिंदे, पुनम ओव्हाळ, अर्चना ढवळे, पोलीस शिपाई वैभव कदम, रविंद्र बत्तीशे, महिला पोलीस शिपाई करिष्मा कडाळे यांच्यासह पथक रवाना करण्यात आले.
छापा कारवाईदरम्यान खालील पाच बांगलादेशी महिलांना ताब्यात घेण्यात आले :
१) सकीना खातुन (वय २६ वर्षे), रा. कोंदा थाना शारशा, बांगलादेश
२) मोनिका अल्ताफ शेख (वय २८ वर्षे), रा. नारायणगंज, तहसिल फुलकुला, ढाका, बांगलादेश
३) परविन जोहरमुल्ला शेख (वय ३५ वर्षे), रा. मोरी गोपीनाथपुर, तहसिल गोपालगंज, जिल्हा पुरातपूर, बांगलादेश
४) हबीब अब्दुल शेख (वय २४ वर्षे), रा. तेलीदंगा, तहसिल नुरगुंडी, जिल्हा कालिया, बांगलादेश
५) इसरात जन्स सलमान शेख (वय २३ वर्षे), रा. जलरजशाही महाराज, ता. मोदाई मुरि, जिल्हा मोड मोईल बाजार, बांगलादेश
ताब्यात घेतलेल्या महिलांची सखोल चौकशी करण्यात आली असता, त्यांनी बांगलादेशातून अवैधरित्या सीमा पार करून छुप्या पद्धतीने भारतात प्रवेश केल्याची माहिती समोर आली. तसेच बुधवार पेठ परिसरात स्वेच्छेने वेश्याव्यवसाय करून उदरनिर्वाह करीत असल्याचेही तपासात निष्पन्न झाले. त्यांच्याकडून बांगलादेशी नागरिकत्वाचे पुरावे प्राप्त झाल्याने त्यांना ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त हृषिकेश रावले, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. फरासखाना पोलीस स्टेशनचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे, पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे, पोलीस अंमलदार सुनिल मोरे, महेश राठोड, गजानन सोनुने, वशिम शेख, रविंद्र बत्तीशे, वैभव कदम तसेच महिला पोलीस अंमलदार राणी शिंदे, पुनम ओव्हाळ, अर्चना ढवळे आणि करिष्मा कडाळे यांनी ही कामगिरी बजावली.










