आचरा (प्रतिनिधी) : चिंदर सडेवाडी येथील ब्राह्मण देव मंदिर येथे सोमवार ११ मे रोजी विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी ब्राह्मण देवाचे दर्शन आणि आशीर्वाद घेतले. यावेळी ब्राह्मण देव सेवा मंडळ चिंदर सडेवाडीच्या वतीने दत्ता सामंत यांचा मुंबई मंडळ अध्यक्ष अनिल वराडकर व ग्रामीण अध्यक्ष संजय लोके यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पंचायत समिती सदस्य दिपक सुर्वे, भाऊ हडकर, मनोज हडकर, दत्ता वराडकर, दादू चिंदरकर, लहू हडकर आदी मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
चिंदर सडेवाडी ब्राह्मणदेव सेवा मंडळाच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा सत्कार….!









