खारेपाटण येत विजेचा शॉक लागून दोघे जखमी

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावात आपल्या स्वतःच्या घराची व परिसराची साफ सफाई व स्वच्छता करत असताना दोन सख्या जुळ्या भावांना विजेचा शॉक लागून गंभीर जखमी झाले.जखमींना तातडीने येथील प्रा.आ.केंद्रात दाखल केल्याने आता त्याची प्रकृती स्थिर आहे.

याबाबत अधिक वृत्त असे की,खारेपाटण कालभैरव – कपिलेश्वर वाडी येथील मूळ रहिवासी असलेल्या व सध्या मुंबई येथे राहणारे श्री प्रसाद प्रमोद राणे वय ३९ व त्याचा सख्खा जुळा भाऊ सिद्धेश प्रमोद राणे वय – ३९ हे आपल्या खारेपाटण येथील मूळगावी नुकतेच आले होते.मुंबई वरून आल्यामुळे आपल्या बंद घराची साफ सफाई स्वच्छता करत असताना आज दुपारी ३.३० च्या सुमारास आपल्या जुळ्या भावाला विजेचा शॉक लागल्याचे लक्षात येताच दुसरा भाऊ त्याला वाचवायला गेला असता त्याला देखील विजेचा शॉक बसला.या घटनेत दोन्ही राणे बंधू गंभीर जखमी झाले.

खारेपाटण पोलिस पाटील श्री अनिकेत जामसंडेकर व ग्रामस्थ श्री संदीप पाटणकर यांनी प्रसंगावधान राखून स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तातडीने येथील खारेपाटण प्रा.आ.केंद्र येथे दाखल करण्यात आले.येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रिया वडाम यांनी त्याच्यावर तातडीने प्राथमिक उपचार केले. त्यामुळे या दोन्ही जुळ्या राणे बंधूंची प्रकृती आता स्थिर आहे.

दरम्यान खारेपाटण येथे दोन दिवसापूर्वी झालेल्या भयंकर चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी विद्युत पोल मोडून पडले असून वीज वाहिन्या तुटून खाली पडल्या आहेत.तर अनेक ठिकाणी घरांची कौले व पत्रे उडून गेली आहेत.व काही ठिकाणी झाडे मोडून पडली आहेत.त्यामुळे खारेपाटण मध्ये अजून ही ७५ टक्के भागात वीज पुरवठा खंडित झालेला असून नागरिकांना या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.याबाबत खारेपाटण सरपंच श्री महेंद्र गुरव यांनी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

error: Content is protected !!