आचरा (प्रतिनिधी) : आचरा परीसरात गवारेड्यांचा वावर वाढला असून बुधवारी सकाळी आचरा माळरानावर गवा रेडा फिरताना ग्रामस्थांच्या नजरेस पडला. सध्या या भागात काही ठिकाणी उन्हाळी भाजीपाला लागवड केली जात असल्याने भाजीपाल्याचे नुकसान होण्याची ग्रामस्थांमध्ये भीती आहे. दिवसा गवारेडा फिरू लागल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आचरा भागात गेल्या दोन दिवसापासून कारीवणे भागात काही ग्रामस्थांना दोन गवारेडे फिरताना दिसून आले होते. बुधवारी नागोचीवाडी लगत आचरा माळरानावर राहणारे बाबू धुरी यांच्या नजरेस गवारेडा दिसून आला. या भागात काही ठिकाणी उन्हाळी भाजीपाला, पिकवीला जातो. मात्र गवा रेड्याचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.