ब्युरो न्युज (सिंधुदुर्ग) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा बारावीचा निकाल 91.25 टक्के लागला आहे. यंदाही निकालात कोकण विभागाने बाजी मारली आहे. 96.01 टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल ठरला आहे. तर 88.13 टक्क्यांसह मुंबई विभाग तळाशी आहे. यंदाही बारावीच्या निकालात मुलींनी मारली बाजी मारली आहे. 93.73 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर मुलांच्या निकालाची टक्कवारी 89.14 टक्के आहे.
विभागनिहाय निकाल
कोकण : 96.01
पुणे : 93.34
कोल्हापूर : 93.28
अमरावती : 92.75
औरंगाबाद : 91.85
नाशिक : 91.66
लातूर : 90.37
नागपूर : 90.35
मुंबई : 88.13
राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावीची बोर्ड परीक्षा 21 फेब्रुवारी 2023 ते 21 मार्च 2023 या काळात आयोजित करण्यात आली होती. संपूर्ण राज्यातून 14 लाख 57 हजार 293 विद्यार्थी परीक्षेला बसले होते, अशी माहिती शिक्षण मंडळाकडून देण्यात आली. राज्यभरात 3 हजार 195 केंद्रावर ही परीक्षा पार पडली.