पंतप्रधान नरेंद्र माेदींची कारकीर्द ९ वर्षे यशस्वी पुर्ण झाल्याबद्दल ” विशेष जनसंपर्क अभियानाचे ” आयोजन

वेंगुर्ले तालुका भाजपा बैठकीत विविध कार्यक्रमाचे नियोजन

९ वर्ष पुर्ती कार्यक्रम उस्त्सव म्हणून साजरा-करणार – प्रसंन्ना देसाई

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : ३० मे रोजी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला ९ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने ३० मे ते ३० जून २०२३ या कालावधीत राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी.नड्डा व प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात “विशेष जनसंपर्क अभियान” संपन्न होणार असून, जिल्हा – मंडल – शक्तीकेंद्र व बुथ पातळीवर वेगवेगळे कार्यक्रम होणार आहेत.

या अभियानाची नियोजन सभा जिल्हा सरचिटणीस व अभियानाचे जिल्हा सहसंयोजक प्रसंन्ना(बाळू) देसाई व प्रदेश का.का.सदस्य शरदजी चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुका कार्यालय वेंगुर्ले येथे संपन्न झाली. यावेळी तालुक्यातील २१ ही शक्तीकेंद्रावर कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. तसेच संपर्क ते समर्थन या अंतर्गत तालुक्यातील प्रमुख घटकातील प्रभावशाली व्यक्ती, खेळाडु, कलाकार, उद्योजक, हुतात्मा सैनिक तसेच अन्य कुटुंबाशी संपर्क करण्यासाठी यादी करण्यात आली. तसेच बुद्धीवंतांचे संमेलनासाठी तालुक्यातील बुद्धीवंतांची यादी बनविण्यात आली. जेष्ठ कार्यकर्त्यांचे संमेलन, संयुक्त मोर्चा संमेलन, लाभार्थी संमेलन इत्यादी होणाऱ्या कार्यक्रमा बाबत चर्चा करुन प्रमुख पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी देण्यात आली.

यावेळी मार्गदर्शन करताना प्रसंन्ना(बाळू) देसाई म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजींच्या नेतृत्वात भारताची प्रतिष्ठा जगभरात उंचावत असून भारताचा सांस्कृतिक वारसा जागतिक पातळीवर पोहचला आहे. देशातील पायाभूत सुविधा विकासाचे जाळे अधिक मजबूत करून आधुनिक भारताचे स्वप्न प्रत्यक्षात साकारत आहे. या अभियानात आपल्या तालुक्यातील बुथ स्तरावर व्यापक जनसंपर्क, लाभार्थी संपर्क, समाजातील विविध घटकांशी संपर्क, जेष्ठ कार्यकर्त्यांशी संपर्क अशा कार्यक्रमातून मोदी सरकारच्या वेगवेगळ्या कल्याणकारी योजना या अभियानातुन सामान्य जनतेपर्यंत पोहचवण्याचे आवाहन केले.
यावेळी तालुकास्तरीय कमीटी सदस्यांना शक्तीकेंद्र निहाय जबाबदारी देण्यात आली.

यावेळी तालुक्याध्यक्ष सुहास गवंडळकर, नगराध्यक्ष राजन गिरप, ता.सरचिटणीस प्रशांत खानोलकर व बाबली वायंगणकर, जिल्हा उपाध्यक्ष अँड. सुषमा खानोलकर, जिल्हा चिटणीस निलेश सामंत, जि.का.का.सदस्य वसंत तांडेल व साईप्रसाद नाईक, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रसाद पाटकर, युवा मोर्चा शहर अध्यक्ष प्रणव वा्यंगणकर, किसान मोर्चाचे बाळु प्रभु, नगरसेवक नागेश उर्फ पिंटु गावडे व प्रशांत आपटे, खरेदी विक्री संघ चेअरमन ज्ञानेश्वर केळजी, सोशल मिडीयाचे श्रीकृष्ण उर्फ राजु परब, ता.उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे, ता.चिटणीस जयंत मोंडकर, शक्तीकेंद्र प्रमुख – सुधीर गावडे – विजय बागकर – गणेश गावडे – रुपेश राणे, अणसुर सरपंच सत्यविजय गावडे, बुथ प्रमुख— शेखर काणेकर – रविंद्र शिरसाठ – श्रीकृष्ण धानजी – संदिप देसाई – बाळु वस्त, समिर नाईक, वेतोरे सो.सा.चेअरमन विजय नाईक, वेतोरे मा.सरपंचा सुमीत्रा गावडे, अनिल नाईक, प्रकाश गावडे, शामसुंदर शिरोडकर, भाग्यश्री राऊळ, क्रांती गावडे, जयश्री गावडे, योगेश गावडे , संजय गावडे , कोमल गावडे, उर्मिला धुरी इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!