ज्युनियर कॉलेज कळसुलीचा १२ वीचा ९६.६१ टक्के निकाल

कणकवली (प्रतिनिधी) : उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा फेब्रु. / मार्च २०२३ या परीक्षेस ज्युनि. कॉलेज ऑफ कॉमर्स अॅण्ड आर्टस्, कळसुली प्रशालेतून कला विभागातून २० विद्यार्थी व वाणिज्य विभागातून ३९ विद्यार्थी असे एकूण ५९ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. प्रविष्ठ विद्यार्थ्यांपैकी ५७ विद्यार्थी उत्तीर्ण होवून प्रशालेचा निकाल ९६.६१% लागला आहे.

यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष पुरुषोत्तम स. दळवी, कार्याध्यक्ष सुर्यकांत रा. दळवी, सरचिटणीस विजय पां. सावंत, व सर्व संस्था पदाधिकारी तसेच कृष्णा रा.दळवी, (स्कूल कमिटी – चेअरमन),नामदेव रा. घाडीगांवकर ( स्कूल कमिटी व्हा. चेअरमन),अतुल सु. दळवी ( स्कूल कमिटी – सदस्य ), मा. रजनीकांत ब. सावंत ( स्कूल कमिटी सदस्य) मुख्याध्यापक व्ही. व्ही. वगरे, वरिष्ठ शिक्षक एस. के. सावळ व सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद, पालकवर्ग आणि कळसुली पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून विद्यार्थ्यांचे व प्रशालेचे अभिनंदन केले आहे.

कला विभाग – प्रथम कु.ठाकूर सोनाली श्रीधर ७८.५०% द्वितीय कु. कदम मनिषा शरद ७६%
त्रितीय कु.सावंत मयुरी सुरेश ७१.६७% वाणिज्य विभाग प्रथम कु. परब दर्शना राजेंद्र ८८%
द्वितीयकु.परब प्रिती प्रकाश ८४.६७% त्रितीय कु. लाड साक्षी बाबू ८३%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!