ईकोफ्रेंडली नरकासुर चे बंधन नाही ; सर्व सहभागी स्पर्धकांनाही विशेष प्रोत्साहन
कणकवली (प्रतिनिधी) : सुदर्शन मित्रमंडळाच्या वतीने नरकासुर स्पर्धेचे आयोजन शनिवार, दि. ७ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता करण्यात आले आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या स्पर्धकाला २० हजार रुपये व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांकासाठी १३ हजार रुपये व चषक, तर तृतीय क्रमांकासाठी ८ हजार रुपये व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच उत्तेजनार्थ प्रथम चार क्रमांकासाठी प्रत्येकी २ हजार ५०० रुपये व चषक, तर सर्व सहभागी स्पर्धकांना प्रत्येकी ५०० रुपये व आकर्षक चषक देऊन प्रोत्साहित करण्यात येणार आहे.
नरकासुराची कलाकृती अधिक आकर्षक आणि नावीन्यपूर्ण व्हावी, या उद्देशाने स्पर्धकांनी विविध तंत्रज्ञानाचा वापर करावा तसेच ईकोफ्रेंडली चे कोणतेही बंधन नरकासुर साकारताना नसल्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. पर्यावरणपूरक संकल्पनेला प्राधान्य देत पारंपरिक कलेसोबत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणाऱ्या कलाकृतींना या स्पर्धेच्या माध्यमातून प्रोत्साहन मिळणार आहे.
स्पर्धेच्या ठिकाणी नरकासुर वधाचे कलाकृती सादरीकरणही करण्यात येणार आहे. डी. पी. रोड, अन्नपूर्णा बेकरीच्या जवळ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदवून आपल्या कलागुणांचे प्रदर्शन करावे, असे आवाहन सुदर्शन मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी वैभव आरोळकर (७२१९८९९९६६), बाळा डिचोलकर, चेतन फोंडेकर, यश हर्णे, संकेत हर्णे, नितीन कुवळेकर आणि प्रवीण सांबड यांच्याशी संपर्क साधावा.












