एस एम ज्युनिअर कॉलेजचे १२ वी परीक्षेत उज्वल यश

यावर्षीही 100 टक्के निकालाची यशस्वी परंपरा कायम

कणकवली (प्रतिनिधी) : एस एस ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स कॉमर्स व एम सी व्ही सी कणकवली शाळेचा एच.एस.सी परिक्षा फेब्रुवारी २०२३ साठी प्रविष्ट विद्यार्थ्याचा सायन्स विभागाचा निकाल दरवर्षीप्रमाणे १०० टक्के लागला असून आपल्या शाळेची २०० टक्के यशाची परंपरा कायम राखली आहे. तसेच कामर्स विभागाचा निकाल ८५.५० व शिक्षण अभ्यासक्रमाचा निकाल ८१.५४ टक्के इतका लागला आहे. शाळेच्या तीनही विभागामध्ये मिळून एकूण १५० विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते.

विज्ञान शाखेमध्ये ८०.०० टक्के गुण मिळवून अनिल विवेक जाधव हा तीनही विभागामध्ये सर्व विद्यार्थ्यात प्रथम आला आहे. तसेच विज्ञान शाखेत जितेंद्र रघुनंदन राणे हा ७०.६७ व दिव्या रविंद्र सुतार ही ६७-३३ कु टक्के गुण मिळवून अनुक्रमे द्वितीय व तृतीय आली आहे.तसेच कॉमर्स शाखेमध्ये मनिश रामदास गिरकर ६०.३३ टक्के, रसिका रविंद्र गुरव ६३.६७ टक्के, रितेश रविंद्र मोदी ६३.१७ टक्के गुण मिळवून अनुक्रमे प्रथम, द्वितीय तृतीय आले आहेत.

शाळेच्या एम सी व्ही सी विभागात किशोर कृष्णा होळकर हा ७० टक्के,हर्षाली भिकाजी मांजरेकर ६९.५० टक्के मिळवून प्रथम व द्वितीय आले आहेत. प्रणव रमेश निकम ६९ ३३ टक्के गुण मिळाल्याने तृतीय क्रमांक प्राप्त झाला आहे.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन कणकवली शिक्षण संस्था कणकवलीचे चेअरमन डॉ.एस.एन तायशेटे, सचिव डी. एम.नलावडे, उपकार्याध्यक्ष एम. ए. काणेकर, प्रशालेच्या प्रभारी प्राचार्या एस. एस. वायंगणकर व इतर शिक्षक वृंद यांनी केले

error: Content is protected !!