सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : एस एस पी एम काँलेज आँफ इंजिनिअरींग च्या काँम्प्युटर विभागातील १६ विद्यार्थ्यांची आणि ए आय एम एल (AIML)विभागातील १२ अशा एकूण २८ विद्यार्थ्यांची क्यूस्पायडर (Qspider) या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये इन्क्यूबेशन प्लेसमेंट साठी निवड झाली आहे. काँम्प्युटर विभागातून सिद्धेश दाभोलकर, लौकेश बिरोडकर, अनिश शर्मा, कोमल तेतगुरे, निसर्ग पडते, आदित्य गावकर,सुयश कुबडे,शुभम कुबडे, ऋतुल चिंदरकर, आकाश पाटील, सानिका सरदेसाई, केतन पाटील, पुष्पराज नाईक, कृपा गावडे, सिद्धार्थ अडीवरेकर,ऋणाल पाटील आणि ए आय एम एल (AIML) विभागातून बालाजी चव्हाण, कोमल डिचवलकर, वरद नाईक, सुशांत पाटील, सिद्धी शिंत्रे, वैष्णव कुबडे, रुपेश शिवगण, रोहित जाधव, निखिल भांदीगरे, प्रज्वल पाटील, डेंझिल डांटास आणि सिद्धार्थ सर्वेकर या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. विशेष म्हणजे या सर्व विद्यार्थ्यांचे अभियांत्रिकी शिक्षण जून २०२४ मध्ये पूर्ण होणार असुन त्यापुर्वीच त्यांची इन्क्यूबेशन प्लेसमेंटसाठी निवड झाली आहे. सदरच्या निवड प्रक्रियेसाठी क्यूस्पायडर कंपनी चे फॉउंडर अँड सीईओ गिरीश शिवान्ना , टेक्निकल लीड मेरी बेनिथा मॅडम यांनी मंगळवार दि २३ एप्रिल २०२४ रोजी ऑनलाईन पद्धतीने प्लेसमेंट ड्राईव्ह घेण्यात आला. त्यामध्ये ऍप्टीट्युड व ग्रुप डिस्कशन पद्धतीने घेण्यात आलेल्या टेस्ट मधून तसेच मुलाखती मधून सदरच्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. ही प्रक्रिया अतिशय कठीण समजली जाते ज्यामध्ये विद्यार्थ्यांच्या प्रोग्रामिंग स्किल, बौद्धिक क्षमता व शिकत असलेल्या विषयांचे आकलन या सर्व पात्रता फेरींमधुन गेल्यानंतर अंतिम मुलाखतीसाठी निवड होते.
एस एस पी एम च्या विद्यार्थ्यांची तंत्रशिक्षणाची आवड आणि त्यांना मिळणारे मार्गदर्शन यामुळेच त्यांची साँफ्टवेअर कंपनीमध्ये निवड होऊ शकते हे विद्यार्थ्यांनी दाखवून दिले आहे.
एस एस पी एम काँलेज आँफ इंजिनिअरींग मागील २५ वर्षांपासून संस्थापक नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली व अध्यक्षा निलमताई राणे, ऊपाध्यक्ष निलेश राणे, सचिव नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली समाजातील विविध स्तरावरील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण ऊपलब्ध करून देत आहे, विद्यार्थ्यांना सर्वांगीण शिक्षण व रोजगार ऊपलब्ध करून देण्यासाठी महाविद्यालयांच्या प्रयत्नांना संस्थेचे ही तितकेच पाठबळ मिळत आहे.
सदरच्या निवड प्रक्रियेकरीता अभियांत्रिकी महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँण्ड प्लेसमेंट आँफिसर प्रा. सोमनाथ मेलसगरे आणि प्राचार्य डाँ. डी एस बाडकर यांनी विशेष प्रयत्न केले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा निलमताई राणे, ऊपाध्यक्ष निलेश राणे, सचिव नितेश राणे, प्राचार्य डाँ. डी एस बाडकर , प्रशासक अधिकारी शांतेश रावराणे, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.