कणकवली तालुक्याचा बारावीचा निकाल ९६. ८० टक्के

सेजल परब, प्राची मेस्त्री, सानिका सावंत तालुक्‍यात अव्वल

कणकवली (प्रतिनिधी) : बारावी परीक्षेत कणकवली तालुक्याचा निकाल ९६.८० टक्के एवढा लागला आहे. तर कणकवली महाविद्यालयातील वाणिज्य शाखेची सेजल परब हिने ९४.०० गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. प्राची मेस्त्री हिने ९३.८३ टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर सानिका सावंत हिने ९३.५० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला आहे.

कणकवली तालुक्यात हरकुळ बुद्रुक ज्युनिअर कॉलेज, आयडियल इंग्लिश स्कूल, एस. एम. हायस्कूल, खारेपाटण हायस्कूल आणि फोंडाघाट येथील मराठे ज्युनिअर कॉलेजचा निकाल १०० टक्के लागला आहे. तर तालुक्यातील १४१ विद्यार्थी विशेष श्रेणीत अाले. प्रथम श्रेणीत ८०२, द्वितीय श्रेणीत ८३३ आणि पास श्रेणीत १०१ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. कणकवली तालुक्यातील इतर गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये वाणिज्य शाखेत मनाली तायशेट्ये ८४.६७ टक्के, समर्थ लाड ८४. १७ टक्के, कलाशाखेत चिन्मयी जावडेकर ७३.८३ टक्के, बुशरा बागवान ७३ १७ टक्के, तन्वी भाबले ६७.६७ टक्के, व्यवसाय शाखेत अंकिता नकाशे ७६.४५ टक्के, गितांजली पवार ७३.६७ टक्के, सुकन्या आडेलकर ७१.३६ टक्के यांचा समावेश आहे.

तालुक्यातील इतर ज्युनिअर कॉलेजचा निकाल पुढीलप्रमाणे आहे. कनेडी ज्यूनियर कॉलेजचा निकाल ९९.४० टक्के लागला आहे. कला शाखेतून प्रथम सेजल सुनिल पाटील ८० टक्के, लक्ष्मण अशोक सदडेकर ७५, हर्षदा नितीन मेस्त्री ७५, सायली श्रीधर सावंत ७० १७ विज्ञान शाखेत सेहा संजय पवार ८०. ५०, सलोनी कदम ७७.८३, गौरी दिपक देसाई ७७.३३ गुण. वाणिज्यमधुन दीप्ती विलास गायकवाड़ ८६ १७, मितेश राजेश पाताडे ८२. ५०, दिक्षा अरुण वारंग ८० ६७ गुण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!