कै. राजाराम मराठे कृषि महाविद्यालयात धिंगरी अळंबीचे यशस्वी उत्पादन


फोंडाघाट (प्रतिनिधी) : कै. राजाराम मराठे कृषि महाविद्यालय फोंडाघाट येथील चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांनी अळंबी लागवड तंत्रज्ञान या प्रयोगातून शिक्षण उपक्रमांतर्गत घिंगरी अळिंबीचे यशस्वी उत्पादन घेतले आहे. अळंबी ही एक प्रकारची पौष्टिक बुरशी असून तिचे मानवी आहारात विशेष महत्व आहे. मधुमेह, हृदयरोग इ. व्याधींनी त्रस्त लोकांसाठी आहारात अळंबीचा समावेश फायदेशीर ठरतो. अळिंबी उत्पादन घेण्यासाठी उत्पादनाची खोली, वाळलेला चारा, अळंबीचे बीज इ. गोष्टींची आवश्यकता असून त्यासोबतच ०५-८०% आर्द्रता व २८-३० ०c सेल्लिम्पस अशा पोषक वातावरणात अळिंबीचे दर्जेदार उत्पादन हमखास मिळते. अळिंबी उत्पादन घेण्यासाठी थोडीफार गुंतवणूक व शास्त्रोक्त प्रशिक्षण घेऊन तरुण व महिला हा व्यवसाय सुरू करू शकतात. महिला बचत गटांमार्फत हा व्यवसाय सुरू केल्यास मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती देखील करता येऊ शकते. सदर उपक्रमात अंतिम वर्षातील प्रतिकराज पाटील, ऋषी परिट, साहिल पाटील, प्रज्योत माने, गौरव लोखंडे,प्रथमेश नागरगोजे, करण पाटील,निलेश पावरा, अथर्व पिसे, राजेश माने, विश्वतेज पाटील, आदित्य माळी, अनिकेत माळी,गौरव पवार, गितेश पुजारे,कुलदीप पवार, योगेश प्रभू, अंजली पाटील , श्रेया पाटील, अंजली माळी, सायली पवार, समीक्षा मांडवकर, पियुषा मांजरेकर, प्रगती पाटील,कीर्ती पाटील , वैष्णवी पाटील, स्नेहल पाटील, या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य पंकज संते सर , विषय शिक्षक प्राध्यापिका.तेजस पाटील मॅडम , प्राध्यापिका.कविता पुजारी मॅडम आणि लामतुरे मॅडम यांनी मार्गदर्शन केले आहे. सदर उपक्रम राबविण्यासाठी ब्राम्हणेश्वर शैक्षणिक व सामाजिक उन्नतीमंडळ या संस्थेचे अध्यक्ष श्री. दिपेश मराठे, मिताली मराठे आणि विद्या राणे पाटील मॅडम यांचे सहकार्य लाभले आहे.

error: Content is protected !!