खारेपाटण हायस्कूलचे संगीत शिक्षक संदीप पेंडूरकर यांचा रघुकुल स्वरविहार संस्थेच्या वतीने सत्कार

खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील शास्त्रीय सुगम संगीत शेत्राशी गेली ११ वर्षे निगडित असलेल्या रघुकुल स्वरविहार सावंतवाडी या संस्थेच्या वतीने खारेपाटण येथील शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण या हायस्कूलचे संगीत विषयाचे शिक्षक संदीप पेंडूरकर सर याचा नुकताच शास्त्रीय सांगीतिक कार्याबद्दल प्रख्यात संवादिनी वादक चिन्मय कोल्हटकर आणि गुरवर्य पंडित दुबळे यांच्या शुभहस्ते श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडी येथे शाल श्रीफळ सन्मानपत्र देऊन विशेष गौरव व सत्कार करण्यात आला.

संदीप पेंडूरकर हे खारेपाटण हायस्कूल येथे संगीत शिक्षक म्हणून ज्ञानदानाचे कार्य करत असून कणकवली येथील आदर्श संगीत विद्यालयाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून संगीत शेत्रात घडवत आहेत.व सांगीतिक कार्याची धुरा समर्थपणे सांभाळत आहेत. त्यांच्या या संपूर्ण कार्याची दखल घेऊन रघुकुल स्वरविहार संस्थेने त्यांचा नुकताच यथोचित सत्कार व सन्मान केला.

यावेळी संस्थेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. खारेपाटण हायस्कूलचे संगित शिक्षक संदीप पेंडुरकर यांच्या संगीत शेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल झालेल्या गौरवाबद्दल खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री प्रवीण लोकरे सचिव श्री महेश कोळसुलकर व सर्व संचालक मंडळ सदस्य तसेच खारेपाटण हायस्कूलचे मुख्यद्यापक संजय सानप यांनी त्याचे विशेष अभिनंदन केले असून त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!