साळगाव हायस्कूलचे बारावी परीक्षेत घवघवीत यश

कुडाळ (प्रतिनिधी) : शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साळगाव बारावी वाणिज्य शाखेचा निकाल 96.77 टक्के लागला आहे. प्रथम क्रमांक नाईक नारायण विलास 78.33 टक्के , द्वितीय पवार निकीता सुदाम 73.33 टक्के , तृतीय गावडे गौरी गुंडू 72.00 टक्के मिळवून यशस्वी झाली आहे. तसेच
बारावी कला शाखेचा निकाल 94.73 टक्के लागला आहे.

सर्व यशस्वी विदयार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन मुख्याध्यापक तकीलदार सर , संस्थाध्यक्ष प्रदीप प्रभूतेंडुलकर , सचिव मुकुंद धुरी व प्रशालेच्यावतीन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!