मंगेश गावकर आणि भाली अन्ना परब यांच्या हस्ते रस्ता कामांचा शुभारंभ
सातेरी मंदिर ते गावठणवाडी स्वामीमठ व सातेरी मंदिर ते चिंदर बाजार(उर्वरीत) रस्त्याचा समावेश
आचरा (प्रतिनिधी) : चिंदर गावठणवाडी येथील दोन रस्त्यांच्या कामांचा आज सातेरी मंदिर येथे शुभारंभ करण्यात आला. सातेरी मंदिर (पश्चिम) (तावडे घर) ते स्वामी मठ अशा 500 मिटर खडीकरण आणि डांबरीकरण रस्ताचा शुभारंभ गावातील प्रतिष्ठित व्यक्ती भाली अन्ना परब यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला तर सातेरी मंदिर(पूर्व) ते चिंदर बाजार मुख्यरस्ता उर्वरीत ग्रा.मा मार्ग 31(300 मिटर) भागाच्या खडीकरण डांबरीकरणाचा शुभारंभ मंगेश गांवकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.
यावेळी उपसरपंच दिपक सुर्वे, ग्रामपंचायत सदस्य-सौ.जान्हवी घाडी, माजी सरपंच तथा भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, माजी सरपंच भालचंद्र खोत, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष गांवकर, अरुण घाडी, दिगंबर जाधव, दादू घाडी, उदय देसाई, पोलिस पाटील दिनेश पाताडे, रवि घागरे, विश्वास खरात, साक्षी पाडावे, सौरभ परब, एकनाथ पवार, गोलतकर, तावडे आदी उपस्थित होते.