ब्युरो न्युज (IPL) :अवघ्या काही तासांत आयपीएलच्या सोळाव्या हंगामाचा विजेत मिळणार आहे. चेन्नई सुपर किंग्जने क्वालिफायर १ मध्ये गुजरातचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. पण गुजरातने क्वालिफायर २ मध्ये मुंबईचा पराभव करत अंतिम फेरी गाठली. आता रविवारी चेन्नई आणि गुजरात यांच्यामध्ये फायनलचा थरार रंगणार आहे.
१ मार्चपासून सुरु झालेला रनसंग्राम २८ मे रोजी थांबणार आहे. १० संघामध्ये दोन महिन्यापासून लढत सुरु आहे. चेन्नई की गुजरात कोणता संघ चषक उंचवणार.. याकडे सर्वांचे लक्ष लागलेय. गुजरात आणि चेन्नई दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. त्यामुळ अंतिम सामना रोमांचक होण्याची शक्यता आहे. गुजरातमधील अहमदाबाद येथे होणारा हा सामना उद्या (रविवार) सायंकाळी 7.30 वाजता सुरू होणार आहे.
चेन्नई पाचव्यांदा चषकावर नाव कोरणार की गुजरात दुसऱ्यांदा जेतेपद पटकावणार… याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहे. चेन्नईला सर्वाधिक चषक जिंकणाऱ्या मुंबईची बरोबरी करण्याची संधी आहे. मुंबईने आतापर्यंत सर्वाधिक पाच वेळा चषकावर नाव कोरलेय. आता चेन्नईला याची बरोबरी करण्याची संधी आहे.