वेंगुर्ले (प्रतिनिधी): बारावी परिक्षेचा वेंगुर्ले तालुक्याचा निकाल ९९ .६३ % लागुन जिल्ह्यात प्रथम क्रमांक वेंगुर्ले तालुक्याने मिळवला. बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाची सायन्स विभागाची सारीकाकुमारी सरोज यादव हीने ९१.८३ %गुण मिळवून तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळाल्याबद्दल वेंगुर्ले शहरातील गवळीवाडा येथील तीच्या निवासस्थानी जाऊन नगराध्यक्ष राजन गिरप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी तिचे आईवडील व कुटुंबीय उपस्थित होते. तसेच खर्डेकर महाविद्यालयाची वाणिज्य शाखेची कु.पुर्वा रामचंद्र करंगूटकर हीने ८७.५० % गुण मिळवून महाविद्यालयात द्वितीय व तालुक्यात सातवी आल्याबद्दल शहरातील गाडीअड्डा येथील निवासस्थानी जाऊन महीला मोर्चाच्या वृंदा गवंडळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच खर्डेकर महाविद्यालयाची विज्ञान शाखेची कु.मिताली चंद्रशेखर कोयंडे हीने ८६.५० % गुण मिळवून महाविद्यालयात तृतीय व तालुक्यात नववी आल्याबद्दल तिचा सत्कार तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच खर्डेकर महाविद्यालयाची कला शाखेची कु.सानिका अमोल वरसकर हीने ८५.३३ % गुण मिळवून प्रथम येण्याचा मान मिळाल्याबद्दल जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई यांच्या हस्ते भटवाडी येथील तिच्या निवासस्थानी जाऊन सत्कार करण्यात आला. तसेच खर्डेकर महाविद्यालयाची कला शाखेची कु.ईशा तुषार भोसले हीने ७६.१७ % गुण मिळवून महाविद्यालयात तृतीय क्रमांक मिळविल्याबद्दल भोसलेवाडी येथील तिच्या निवासस्थानी जाऊन ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शहर अध्यक्ष सुरेंद्र चव्हाण, अल्पसंख्याक सेलचे रफिक शेख, बुथ अध्यक्ष शेखर काणेकर, बुथ अध्यक्ष रविंद्र शिरसाठ, बुथ अध्यक्ष निलेश गवस तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचे कुटुंबीय उपस्थित होते .