चौके ( प्रतिनिधी ) :मालवण तालुक्यातील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा चा एस. एस. सी. परिक्षेचा निकाल १००% लागला आहे. या परिक्षेसाठी प्रशालेतून ८५ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. ते सर्व उत्तीर्ण होऊन निकाल १००% लागला आहे. विशेष श्रेणीमध्ये ४१ , प्रथम श्रेणीमध्ये ३२ , द्वितीयमध्ये ११ आणि तृतीय श्रेणीमध्ये १ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यापैकी अनुक्रमे कुमारी सई विनय ताम्हणकर हिने ९७.६० % गुण मिळवून प्रथम , सिद्धी साबाजी राऊत हिने ९५.२० % गुण मिळवून द्वितीय तर कुमारी निधी राजन गावडे हिने ९२.८० % गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त निवृत्त कर्नल शिवानंद वराडकर , ॲड. एस. एस. पवार , संस्था अध्यक्ष अजयराज वराडकर , उपाध्यक्ष आनंद वराडकर , शेखर पेणकर , सचिव सुनिल नाईक , विजयश्री देसाई , सहसचिव साबाजी गावडे , खजिनदार रवींद्रनाथ पावसकर , व इतर संचालक , शालेय समिती अध्यक्ष सुधीर वराडकर , माजी विद्यार्थी संघटना अध्यक्ष अनिल फणसेकर, मुख्याध्यापक संजय नाईक यांनी अभिनंदन केले आहे.