पत्रकार विशाल रेवडेकर यांच्या सतर्कतेमुळे वाचला रेल्वे प्रवाशाचा जीव

मंगला एक्सप्रेसमध्ये अत्यवस्थ प्रवाशाचे वाचवले प्राण; वंदे भारत ट्रेनच्या वृतांकणासाठी जात असताना दाखवली सतर्कता

सिंधुदुर्ग (राजन चव्हाण) : मंगला एक्सप्रेसमध्ये झांशी ते मेंगलोर प्रवास करणाऱ्या राजेंद्रकुमार या प्रवाशाला अचानक फिट्स आली. याच ट्रेनमधून न्यूज 18 लोकमत चे सिंधुदुर्ग जिल्हा प्रतिनिधी विशाल रेवडेकर प्रवास करत होते. अत्यवस्थ झालेल्या राजेंद्रकुमार ला पत्रकार विशाल रेवडेकर यांनी सतर्कता दाखवत धावत्या ट्रेनमध्येच चेस्ट पंपिंग केले आणि पायाच्या बोटांमध्ये पेन ठेवून दाब देत राजेंद्रकुमार ला शुद्धीवर आणत त्याचे प्राण वाचवले. ही घटना आज दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास गोवा थिविम रेल्वे स्थानकादरम्यान घडली. 3 जुन रोजी कोकण रेल्वेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या वंदे भारत या आलिशान आणि सुपरफास्ट रेल्वेचा शुभारंभ होणार आहे. वंदे भारत ट्रेन च्या वृत्तांकणासाठी सिंधुदुर्ग न्यूज18 लोकमत चे जिल्हा प्रतिनिधी विशाल रेवडेकर हे मंगला एक्सप्रेस च्या जनरल बोगीतून आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास कणकवली ते मडगाव प्रवास करत होते. जनरल बोगी प्रवाशांनी खचाखच भरलेली होती. त्यातच दुपारच्या उष्णतेने सगळे हैराण झाले होते. ट्रेन थिविम स्टेशन सोडून मेंगलोर च्या दिशेने निघाली असताना दुपारी 3 वाजण्याच्या दरम्यान अचानक राजेंद्रकुमार या प्रवाशाला फिट आली. राजेंद्रकुमार ची अत्यवस्थ अवस्था पाहून त्याच्या सोबत असलेले नातेवाईक ही गांगरून गेले. तेवढ्यात त्याच बोगीतून प्रवास करणाऱ्या पत्रकार विशाल रेवडेकर यांनी सतर्कता दाखवत राजेंद्रकुमार ला चेस्ट पंपिंग केले. त्याच्या पायाच्या बोटांत पेन ठेवून बोटांवर दाब दिला. या प्राथमिक उपचारांचा फायदा होऊन राजेंद्रकुमार शुद्धीवर आला.त्यानंतर मडगाव स्टेशनवर प्लँटफॉर्म वर ऑन ड्युटी असलेल्या डॉक्टर कडे राजेंद्रकुमार ला नेऊन चेकअप केले. ऐन वेळी पत्रकार विशाल रेवडेकर यांनी प्राथमिक उपचार केल्यामुळे राजेंद्रकुमार चे प्राण वाचू शकले. या घटनेमुळे कोकण रेल्वेत इमर्जन्सीसाठी मेडिकल ट्रीटमेंटसाठी तज्ञ् पथक असल्याची गराज दिसून आली आहे. पत्रकार विशाल रेवडेकर सतर्कते बद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!