वेतोरे पालकरवाडी येथे गवारेडा अढळला मृतावस्थेत

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : वेतोरे-पालकरवाडी भागातील शेतमळ्याच्या ठिकाणी एका गवारेड्याच्या कळपातील गवारेड्याने एकटा सुसलेल्या गवारेड्यावर हल्ला केला. यावेळच्या झुंजीत तो एकटा असलेला गवारेडा मृत्यूमुखी पडला. ही घटना गुरुवारी पहाटे ५.३० ते ६ वाजण्याच्या सुमारास घडली. कुडाळ वनक्षेत्रपाल तथा सावंतवाडी सहाय्यक वनसंरक्षक अमृत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मठ वनपाल सावळा कांबळे, मठ वनरक्षक सूर्यकांत सावंत, तुळस वनरक्षक विष्णू नरळे, वनकर्मचारी संतोष इब्रामपूरकर, शंकर पाडावे घटनास्थळी दाखल झाले. वस्तुस्थिती पाहून आडेली येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. धनंजय कोठार यांना शवविच्छेदनासाठी बोलावले. तत्पूर्वी

स्पॉट पंचनामा करण्यात आला. आडेली येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. धनंजय कोठार यांनी शवविच्छेदन केल्यानंतर वराडकर यांच्याच शेतात दहनविधी करण्यात आले. यावेळी सरपंच बंड्या पाटील, वन्यप्राणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अनिल गावडे, दीपक वराडकर, विकास अणसूरकर, संतोष वराडकर, महेश कोंडसकर, स्वप्नील वराडकर, बाळा दळवी, सतीश गावडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!