कु.सावली हरयान व कु. संचीता केंगाळे ९५.४० % गुण मिळवून विद्यालयात प्रथम
खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या एस एस सी मार्च – २०२३ बोर्ड परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला असून यामध्ये खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण संचलित शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण या हायस्कुलचा १०० % निकाल लागला असून कु.सावली महादेव हरयान व कु.संचिता रवींद्र केंगाळे या दोन्ही विद्यार्थिनीने ९५.४० % गुण मिळवित विद्यालयात सूनक्तिकरित्या प्रथम येण्याचा मान पटकावला आहे.
खारेपाटण हायस्कूल मध्ये एकूण १२३ एवढी मुले परीक्षेला बसली होती.ही सर्व मुले पास होऊन शाळेचा १०० % एवढा निकाल लागला आहे. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री प्रवीण लोकरे यांनी अभिनंदन केले आहे खारेपाटण हायस्कूल मध्ये अनुक्रमे उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पुढील प्रमाणे प्रथम क्रमांक – कु.सावली महादेव हरयान, गुण -४७७ (९५.४० %) व कु.संचिता रवींद्र केंगाळे,गुण – ४७७ (९५.४०%) द्वितीय क्रमांक – कु.अर्पिता अरविंद पाटील,गुण – ४६६ (९३.२० %) तृतीय क्रमांक – कु.हसरी विनायक म्हाडेश्वर,गुण – ४६३ (९२.६० %) व सोहम गजानन कोलते,गुण – ४६३ (९२.६० %) या दोन्ही विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला. गुणवंत सर्व विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक केले जात आहे.
खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण चे अध्यक्ष श्री प्रवीण लोकरे,सचिव – श्री महेश कोळसुलकर व सर्व संचालक मंडळ सदस्य तसेच खारेपाटण हायस्कूलचे मुख्याद्यापक श्री संजय सानप सर, पर्यवेक्षक श्री गुरसाळे सर व शाळेचे सर्व शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी दहावी बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे गुणवंत विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.














