माजी सैनिक, माजी सैनिक विधवांनी ओळखपत्र काढण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करावी…!

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : माजी सैनिक,माजी सैनिक विधवा, माजी सैनिक अवलंबित तसेच नव्याने सेवानिवृत्त होणारे सैनिक यांना जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातून प्राप्त होणारे ओळखपत्र प्राप्त करुन घेण्यासाठी आता ऑनलाईन पध्दतीचा नोंदणी करावी. त्यासाठी सैनिक कल्याण विभाग,पुणे यांच्या www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेस्थळाचा वापर करुन संबंधितांनी स्वत: रजिस्ट्रेशन करुन घेणे अनिवार्य आहे. या रजिस्ट्रेशनसाठी फक्त माजी सैनिकास रु.100 एवढी रक्कम फी स्वरुपात ऑनर्लान पध्दतीने आकारण्यात येईल.

रजिस्ट्रेशन करण्यासाठी पुढीलप्रमाणे कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड, डिश्चार्ज बुक संपूर्ण पानांसंहित, पी.पी.ओ. पेन्शन बुक पासबुकाचे पहिले पान, इ.सी.एच.कार्ड, 2 फोटो, सर्व संबंधितांनी नवीन ओळखपत्र बनविण्यासाठी उपरोक्त संकेतस्थळावर आपले रजिस्ट्रेशन केल्यानंतर सर्व कागदपत्रांच्या प्रिंटसह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय,सिंधुदुर्ग येथे ओळखपत्र प्राप्त करण्यासाठी संपर्क साधावा,असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!