ज्ञानदीप माध्यमिक विद्यालयाचा निकाल 100%

आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय वायंगणीचा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा दहावीचा निकाल 100% लागला आहे. प्रशालेतून 17 विद्यार्थी परीक्षेत बसले होते त्या पैकी सर्व विद्यार्थी यशस्वी झाले.यशस्वी विद्यार्थ्यांन मध्ये कु. युक्ता प्रकाश सावंत हिने 85.80% गुण प्राप्त करत प्रथम, कु. सुमित रामदास सावंत याने 84.80% गुण प्राप्त करत व्दितीय, कु.काजल प्रदिप गराठे हिने 82.00% गुण प्राप्त करत तृतीय क्रमांक प्राप्त केला.

यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक टकले, सहकारी शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष सदानंद राणे,कार्यकारीनी सदस्य दिपक सुर्वै, समृद्धी आसोलकर तसेच सर्वांनी अभिनंदन केले आहे

error: Content is protected !!