जिल्हा पोलिस दलामध्ये ई-ऑफिस कार्यान्वित…!

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयातील सर्व शाखा व सर्व मंत्रालयीन कर्मचारी यांचे कामकाज ई-ऑफिस प्रणाली व्दारे दिनांक 1 मे 2023 रोजीपासून कार्यान्वित करण्यात आलेले आहे. अशी माहिती पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी दिली आहे.

संगणकीय प्रणालीव्दारे संबंधीतास SMS चे माध्यमातून आपले टपाल सध्या कोणत्या टेबल/ शाखा/ पोलीस ठाणेकडे आहे. याबाबतची माहिती मिळू शकणार आहे. त्याचप्रमाणे प्राप्त टपाल ई- ऑफिसचे माध्यामातून संबंधीतास पुढील कार्यवाहीस प्राप्त होणार असल्यामुळे सर्व शाखा, पोलीस ठाणे तसेच उपविभागीय कार्यालय यांचे कामकाजामध्ये एकसूत्रीपणा व गतिशीलता येऊन कामकाजास विलंब होणार नाही.

शासकिय कामकाजात संगणकाचा अधिकाधिक वापर करून कामकाज गतिमान व्हावे, कामकाजात सुसूत्रता यावी. दस्तऐवज व माहिती सुरक्षीत त्वरेने व जलद गतीने संबंधीताना प्राप्त होऊन निर्णय प्रक्रिया सुलभ व्हावी, याकरिता ई-ऑफिस प्रणालीचा प्रभावी वापर करून सदर प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी महाराष्ट्र शासन माहिती तंत्रज्ञान संचालनालय, शासन परिपत्रक आवश्यक सुचना देण्यात आलेल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!