वेंगुर्ले (प्रतिनिधी) : माध्यमिक शालांत दहावी परीक्षेचा वेंगुर्ले तालुक्याचा निकाल ९९.१३ % लागला. ६९० पैकी ६८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वेंगुर्ले तालुक्यात न्यु इंग्लिश स्कुल उभादांडाची विद्यार्थिनी कु. प्रतीक्षा नाईक व अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर परुळेची कु. परी सामंत या दोघींनी ९८.२०% गुण मिळवून संयुक्तिक प्रथम क्रमांक मिळवला. परबवाडा – कणकेवाडी मध्ये रहात असलेली प्रतीक्षा प्रदीप नाईक हिचा तिच्या निवासस्थानी जाऊन भाजपा वेंगुर्लेच्या वतीने परबवाडा सरपंचा शमिका बांदेकर व ता.उपाध्यक्ष मनवेल फर्नाडिस यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व भेटवस्तु देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी तिची आई पौर्णिमा नाईक हीचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना(बाळू) देसाई, तालुक्याध्यक्ष सुहास गवंडळकर, ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर, उपसरपंच पपू परब, माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रा. सदस्य हेमंत गावडे, माजी सभापती सारिका काळसेकर, ग्रा. स. सुहीता हळदणकर व स्वरा देसाई, योगिता नाईक, डॉ. बाळू गवंडे, चेतन देसाई, शैलेश बांदेकर, भारती नाईक उपस्थित होते.