फोंडाघाटात तीव्र वळणावरून ऑइल टँकर खालील रस्त्यावर पडल्याने आगीत भक्षस्थानी !

दोन्ही बाजूची वाहतूक खोळंबली, वाहनांच्या लांबच लांब रांगा ,!!!

रस्त्यावरील खड्ड्यामुळे हे अपघात

फोंडाघाट (प्रतिनिधी) : सायंकाळी 6:45 च्या फोंडा गावापासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर आणि खिंडी पासून दीड किलोमीटर अंतरावर ऑइलने भरलेला टँकर तीव्र वळणावरील खोल खड्ड्यात, टँकर मधील ऑइल हेलकावल्यामुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. आणि तीव्र वळणाच्या खालून जाणाऱ्या रस्त्यावर कोसळला. त्यामुळे शॉर्ट सर्किट होऊन सदर टँकरने रस्त्यावर पेट घेतला. चालक वाहनांमध्ये अडकला असण्याची भीती व्यक्त होत आहे. मात्र टॅंकर आगीच्या भक्षस्थानी पडला. यापूर्वी याच ठिकाणी फरशीचा ट्रक असाच कोसळला होता.

घटनेची खबर मिळतात फोंडा आऊट पोस्टचे कॉन्स्टेबल सचिन माने आणि कॉन्स्टेबल राजू आघाव घटनास्थळी रवाना झाले. ऑइल मुळे रौद्ररूप धारण केल्याने वाहन बाजूला घेणे अशक्य झाले होते. मात्र काही धाडसी वाहन चालकांनी एका बाजूने वाहने कोल्हापूरच्या दिशेने काढली. कणकवलीचा बंब इतरत्र गेल्याने कुडाळवून आगीचा बंब मागविण्यात आला आहे. कणकवली पोलीस स्टेशनची सहकारी 7:30 वाजता घटनास्थळी पोहोचले आहेत. मात्र आगीची तीव्रता कमी होईपर्यंत वाहने दुतर्फा थांबून ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे घटनास्थळापासून दोन्ही बाजू वाहनांच्या रांगात रांगा लागल्या आहेत. काही वाहने वळवून परत आणली. चेक पोस्ट वर मोठ्या गाड्या कॉन्स्टेबल घाडीगावकर यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार थांबविले आहेत.खिंडीपासून नांदगाव टिट्यापर्यंत पडलेल्या मोठ्या खड्ड्यांचा हा परिणाम आहे असे जाणकार सांगतात. त्यामुळे संबंधित विभागाने खड्ड्यांचा त्वरित भरणा करून मार्ग सुखकर करावा अशी आग्रही मागणी होत आहे कणकवलीचा बंब आठ वाजता घटनास्थळी रवाना झाला आहे.

error: Content is protected !!