तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, तत्कालीन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून १ कोटीचा निधी मंजूर
आ. वैभव नाईक यांच्या हस्ते झाले भूमिपूजन
कुडाळ ( अमोल गोसावी ) : तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि तत्कालीन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून व खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, काँग्रेस तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, अतुल बंगे, यांच्या पाठपुराव्यातून कवठी मार्गे चेंदवण निरूखेवाडी धबधबा विकसित करणे या कामासाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत १ कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये धबधब्याच्या ठिकाणी पायऱ्यांचे बांधकाम करणे, सुशोभीकरण करणे, वाहनतळ बनविणे, कवठी बांदेकरवाडी रस्ता बनविणे, पेडणेकर घराशेजारी संरक्षक कठडा बांधणे हि कामे करण्यात येणार आहेत. या कामाचे भूमिपूजन आज आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
कवठी मार्गे चेंदवण निरूखेवाडी धबधबा हे अतिशय सुंदर पर्यटन स्थळ आहे. धबधबा प्रवाहित झाल्यानंतर हजारो पर्यटक याठिकाणी भेट देतात. या धबधब्याच्या ठिकाणी आवश्यक सोयीसुविधां बरोबरच धबधबा विकसित होणार आहे. त्यामुळे याठिकाणीच्या पर्यटनात वाढ होणार आहे.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, अतुल बंगे, काँग्रेस तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, रुपेश पावसकर, दीपक आंगणे, कवठी माजी सरपंच रुपेश वाडयेकर, मंगेश बांदेकर, चेंदवण माजी सरपंच उत्तरा धुरी, ऋतुजा खडपकर, ग्रा. पं. सदस्य सविता बांदेकर, ममता वाडयेकर, भूषण बांदेकर, नंदकिशोर वाडयेकर, मंजुनाथ फडके, दिनेश गोरे, संचिता फडके, रुपेश खडपकर, अरुण परुळेकर, मुरलीधर बांदेकर, अमृता पार्सेकर, राजन खोबरेकर, अनिल चिचकर, प्रशांत बांदेकर, रवी पेडणेकर, दिलीप परुळेकर, रमेश परुळेकर, संजय खोबरेकर, साक्षी जोशी, सुरज पार्सेकर, कुणाल बांदेकर आदीसह कवठी चेंदवण मधील पदाधिकारी, शिवसैनिक ग्रामस्थ उपस्थित होते.