देवगड येथे कांदळवन वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन

देवगड (प्रतिनिधी) : जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने केंद्रशासनाच्या ‘MISHTI’ कार्यक्रम (Mangrove Initiative for Shorelline Habitats and Tangible Incomes) अंतर्गत वनविभाग सावंतवाडी आणि कांदळवन कक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मौजे मिठबांव सव्हे नं. २८९, तालुका देवगड येथे कांदळवन वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वृक्षारोपण कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हयातील आदिवासी लोककला पाक व जेष्ठ कलावंत पद्मश्री पुरस्कार प्राप्त परशुराम गंगावणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पंचायत समिती देवगडच्या गट विकास अधिकारी करिश्मा नायर, मिठबांव सरपंच महादेव उर्फ भाई नरे तंटामुक्ती समिती मिठबांवचे अध्यक्ष पंडीत पारकर, मानद वन्यजीव रक्षक सिधुदुर्ग प्रा. नागेश दप्तरदार, उपवनसंरक्षक, (प्रा) वनविभाग सावंतवाडी एस. नवकिशोर रेड्डी, वनक्षेत्रपाल, कांदळवन कक्ष, मालवण प्रदिप पाटील व वनक्षेत्रपाल कणकवली रा. द. घुणकीकर, वनक्षेत्रपाल कुडाळ अमृत शिंदे, वनपाल देवगड सा. चा. फकीर व राऊंड स्टाफ तसेच विभाग सातवाडी, विमल वन प्रतिष्ठान आणि यु. एन. डी. पी. जी. सी. एफ. प्रकल्पाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

केंद्र शासनाच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने देशातील किनारी प्रदेशातील जीवन आणि तेथील स्थानिकांच्या उपजिविकेसाठी महत्वाच्या असलेल्या कांदळवनाच्या संरक्षण आणि संवर्धनाला सर्वोच्च प्राधान्य देत “Mangrove Initiative for Shoreline Habitats and Tangible incomes (MISHTI) ही योजना राबविण्यात येत आहे. ही योजना राबविताना देशातील ११ किनारी राज्य व केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकाच वेळी कांदळवन खारफुटी वृक्ष लागवड करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रा राज्यात एकूण ५५.२८ हेक्टर कांदळवन क्षेत्रावर हे रोपवन करण्यात आले असून त्यापैकी सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये मोजे मिठबांव देवगड येथे ०.१७ हे क्षेत्रात कांदळवन वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी कांदळवनाच्या मित्र प्रजातीच्या रोपांची लागवड करण्यात आली. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिल्ली येथून देशातील विविध ठिकाणी संपन्न होत असलेलेल्या वृक्षारोपण दी एकाचवेळी व्हीडीओ कॉन्फरन्स द्वारे मार्गदर्शन केले. प्रधानमंत्री यांनी मार्गदर्शन करताना देशभरात राबविण्यात येणान्या MISHTI योजनेची व्याप्ती किनारी भागातील कांदळवन संरक्षण आणि संवर्धनसाठी राबविण्यात येणारे विविध उपक्रम, तसेच कांदळवनामुळे किनारी भागातील लोकासाठी निर्माण होणारे उपजिविका याबाबत मार्गदर्शन केले. तसेच शासनांच्या या योजनेमध्ये सक्रीय सहभाग घेवून भविष्यात कांदळवन संरक्षण व संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक असून त्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे असे आवाहन केले.

प्रमुख अतिथी पद्मश्री परशुराम गंगावणे यांनी मनोगत व्यक्त करताना पर्यावरण संवर्धन व पर्यावरण संतुलनासाठी वृक्षारोपणाची आवश्यकता याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. तर उपवनसंरक्षक (प्रा) वनविभाग सावंतवाडी मा. एस. नवकिशोर रेड्डी यांनी कांदळवन वृक्षारोपण कार्यक्रमाचे व्याप्ती कांदळवनांची किनारी भागातील संरक्षक म्हणून असलेली भूमिका आणि MISHTI योजना राबविण्याबाबतची उद्दीष्टे याबाबत मार्गदर्शन केले.

वनविभाग सातवाडी आणि कांदळवन कक्ष, मालवण यांच्या वतीने आयोजित या कांदळवन वृक्षारोपण कार्यक्रमास स्थानिक ग्रामस्थ, स्वयंसेवी संस्था, शाळा महाविद्यालयीन विद्यार्थी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी कांदळवन कक्ष, कांदळवन प्रतिष्ठान यांचे मार्फत राबविण्यात येणाऱ्या कांदळवन संरक्षण व उपजिविका निर्माण योजना व यु. एन. डी. पी. जी. सी. एफ. BORICC अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपजिविका योजने संबंधित माहिती व जनजागृती साठी उभारण्यात आलेला स्टॉल एक आकर्षण ठरले वृक्षारोपणासाठी एस. एच. केळकर महाविद्यालय देवगडचे एन. सी. सी. कॅडेट्स, रामेश्वर हायस्कूल मिठबांवचे विद्यार्थी, कांदळवन कक्षामार्फत राबविण्यात येणाऱ्या उपजिविका योजने अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या कांदळवन सहव्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व सदस्य सृष्टीज्ञान प्रतिष्ठान, मुंबई व युवालक्ष्य शैक्षणिक आणि सामाजिक संस्था, दहिचावचे पदाधिकारी व सदस्य तसेच मिठबांव तांबळडेग व पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित राहून वृक्षारोपण कार्यक्रमात सक्रीय सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!