आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

मुणगे हायस्कुल येथे क्रीडा महोत्सवाचा शुभारंभ!

मसुरे (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील मुणगे येथील श्री भगवती हायस्कूल आणि कै.विणा सुरेश बांदेकर ज्युनिअर कॉलेज ऑफ व्होकेशनल कोर्सेस येथे वार्षिक क्रीडा महोत्सवाचा शुभारंभ श्री भगवती एज्युकेशन सोसायटीचे व्यवस्थापक आबा पुजारे यांच्या हस्ते झाला.कार्यक्रमाच्या प्रारंभी क्रीडा ज्योत प्रज्वलित करून सर्व…

कणकवली येथे २४ डिसेंबर पासून नाथ पै एकांकिका स्पर्धा !

वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानचे आयोजन ; नाट्य रसिकांसाठी महापर्वणीच कणकवली (प्रतिनिधी): येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्यावतीने ४६ वी राज्यस्तरीय बॅ. नाथ पै एकांकिका स्पर्धा २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेला २४ डिसेंबर पासून संस्थेच्या नाट्यगृहात प्रारंभ होणार आहे.…

कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे वाड्मय पुरस्कारासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन

मालगुंड (प्रतिनिधी): कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे कोकणातील सभासद साहित्यिकांना विविध वाड्मयीन व वाड्मयेतर पुरस्कार प्रतिवर्षी दिले जातात. सन २०२२ – २३ साठी घोषित होणाऱ्या वाड्मयीन व वाड्मयेतर पुरस्कारासाठी पुस्तके मागविण्यात येत आहे. हे सर्व पुरस्कार कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कोकणातील…

आचरा येथे २५ जानेवारीला जिल्हास्तरीय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धा

आचरा (प्रतिनिधी): रामेश्वर सार्वजनिक वाचनमंदिर आचरा तर्फे प्रजासत्ताक दिनाच्या पुर्व संध्येला गुरुवार २५ जानेवारी २०२४ रोजी दुपारी २.३०वाजता देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. १४ वर्षाखालील आचरा मर्यादित शालेय गट आणि १४ वर्षावरील जिल्हास्तरीय अशा दोन गटात…

संदिपभाई पारकर स्मृती रक्तदान शिबिर 28 डिसेंबर रोजी

चिंदर सेवा संघाचे जिल्हा रक्तपेढी सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने आयोजन रक्ताचे पुण्यदान करा-प्रकाश मेस्री. भाई तावडे यांचे आवाहन आचरा (प्रतिनिधी): मालवण तालुक्यातील चिंदर येथील चिंदर सेवा संघ प्रतिवर्षी आई भगवती माऊली यात्रा व श्री दत्त जयंती उत्सव यांचे औचित्य साधून जिल्हा…

श्री स्वामी समर्थ मठ हडपिड येथे उत्साहात साजरा होणार दत्त जयंती उत्सव

देवगड (प्रतिनिधी): श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचलित श्री स्वामी समर्थ मठ हडपिड आयोजित “श्री दत्त जयंती उत्सव ” २६ डिसेंबर २०२४ ला साजरा करण्यात येणार असून आपण सहकुटुंब स्वामी मित्रपरिवार भक्ती भावानी उपस्थित राहून स्वामी महाराजांच्या आशीर्वाद…

वैभववाडीत सोनाळी येथे २३ डिसेंबर रोजी रक्तदान शिबीर होणार संपन्न

श्री.पावणादेवी मंडळ सोनाळीच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन वैभववाडी (प्रतिनिधी): शनिवार दि.२३ डिसेंबर रोजी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान वैभववाडी व श्री.पावणादेवी मंडळ सोनाळी यांच्या वतीने ग्रामपंचायत येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे, तर बुधवार दि. २७ डिसेंबर ते शनिवार…

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत २४ डिसेंबर रोजी पुणे येथे सुतार समाजाचा महामेळावा

सिंधुदुर्गातील तमाम सुतार समाज बांधवांनी उपस्थित रहावे – समन्वय समिती अध्यक्ष प्रकाश मेस्री यांचे आवाहन आचरा (प्रतिनिधी): पुणे जिल्ह्यातील देवाची आळंदी येथील ३३२, प्रदक्षिणा रोड, फुटवाले धर्मशाळा येथे सुतार समाजाचा महामेळावा २४ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. या महामेळाव्यास…

माणगाव विभागातील विविध विकास कामांची आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत भूमिपूजने

विकास कामांच्या पूर्ततेबाबत ग्रामस्थांनी मानले आ. वैभव नाईक यांचे आभार कुडाळ (प्रतिनिधी): कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी माणगाव जि. प. विभागातील माणगाव व आकेरी गावात मंजूर केलेल्या विविध कामांची भूमिपूजने रविवारी त्यांच्या उपस्थितीत करण्यात आली. याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार…

जामसंडे येथील भगवती ट्रेडर्स हार्डवेअर दुकानाला रात्री लागली आग ; लाखोंचे नुकसान

देवगड (प्रतिनिधी): जामसंडे येथील भगवती ट्रेडर्स या दुकानाला मध्यरात्री बाराच्या बारा वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आजूबाजूच्या ग्रामस्थांनी तसेच पटेल बंधूंनी घटना स्थळी धाव घेतली.आगीवर नियंत्रण मिळण्यासाठी शर्तीचे प्रयत्न…

error: Content is protected !!