बिडवाडी दत्तमंदिर येथे दत्तजयंतीनिमित्त 22 पासून विविध कार्यक्रम

कणकवली (प्रतिनिधी) : बिडवाडी दत्तमंदिर येथे दत्तजयंती निमित्त 22 ते 27 डिसेंबर या कालावधीत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम,कीर्तन,भजने,दशावतारी नाटक, सुगम संगीत, शिवकालीन मर्दानी खेळ अशा विविध कार्यक्रमांचा समावेश आहे.

शुक्रवार 22 ते 26 डिसेंबर या कालाधीत श्रींची महापूजा व महाभिषेक, दुपारी 1 ते 3 महाआरती, महाप्रसाद असे कार्यक्रम होणार आहेत. 22 रोजी सायंकाळी 4 ते 8 मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, त्यानंतर भजने, रात्रौ 9 ते 10 ह.भ.प. बुवा महेंद्र पंतमिराशी यांचे कीर्तन, शनिवार 23 डिसेंबर रोजी सायं. 4 ते 7 होममिनिस्टर बिडवाडी, त्यानंतर भजने, रात्रौ ह.भ.प. बुवा पंतमिराशी यांचे कीर्तन, रविवार 24 डिसेंबर रोजी दु. 3 ते 8 महिलांच्या फुगडी स्पर्धा, त्यानंतर भजने, रात्रौ ह.भ.प. बुवा चिंतामणी सामंत, वेंगुर्ले यांचे कीर्तन, सोमवार 25 डिसेंबर रोजी सायं. 4 ते 7 सुगम संगीत, भजने, रात्रौ. ह.भ.प. बुवा श्री.सामंत यांचे कीर्तन, 26 डिसेंबर रोजी सायं. 4 वा. दत्त जन्मावर कीर्तन, सायं. 6.20 श्रींचा जन्मोत्सव सोहळा, 7 वा. पासून ओटी भरणे कार्यक्रम, रात्रौ भजने व शिवकालीन मर्दानी खेळ, रात्रौ 1 वा. लळीत कीर्तन, रात्रौ 2 वा. हनुमान दशावतार नाटयमंडळ, राठिवडे यांचे नाटक होणार आहे. वरील कालावधीत दरदिवशी रात्रौ. 10 ते 10.30 या वेळेत श्रींची पालखी प्रदक्षिणा असणार आहे. 27 डिसेंबर रोजी सकाळी समाराधाना, दुपारी महाआरती व महाप्रसाद असे कार्यक्रम होणार आहेत. तरी या कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री गुरुदेव दत्तमंदिर देवस्थान कमिटी बिडवाडी यांनी केली आहे.

error: Content is protected !!