मालवण – कांदळगाव मधील चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी कणकवलीत सापडला पोलिसांच्या जाळयात

कणकवली (प्रतिनिधी) : मालवण कांदळगाव येथील चोरीच्या गुन्ह्यात फरार असलेला संशयित विनोद विश्वनाथ कदम (रा. कांदळगाव) याला कणकवली पोलिसांनी येथील बस स्थानकातून ताब्यात घेऊन मालवण पोलिसांच्या ताब्यात दिले. ही कारवाई बुधवारी सायंकाळी ५.४५ वा. च्या सुमारास केली.

कांदळगाव- सम्राट अशोकनगर येथील निकिता निलेश कदम यांच्या घरातील वूडकटर व ग्रास कटर चोरल्याप्रकरणी मालवण पोलीस ठाण्यात ८ नोव्हेंबर रोजी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही घटना २२ ऑक्टोंबर ते ७ नोव्हेंबरच्या दरम्यान घडली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या गुन्ह्याचा तपास मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रमोद नाईक करत होते. संशयित विनोद कदम याच्यावर संशय असल्याने मालवण पोलीस त्याचा मोबाईल लोकेशन द्वारे शोध घेत होते. यादरम्यान मंगळवारी त्याचे मोबाईल लोकेशन मुंबई येथे दिसत असल्याने मालवण पोलीस मुंबई येथे जात होते. विनोद कदम यांचे बुधवारी मोबाईल लोकेशन चेक केले असता कणकवली बस स्थानकात दिसत होते. त्यामुळे मालवण पोलिसांनी याबाबतची माहिती कणकवली पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, कॉन्स्टेबल श्री. जांभळे व मालवण पोलिस हवालदार प्रमोद नाईक यांनी कणकवली बस स्थानकात जात विनोद कदम याला ताब्यात घेतले.

error: Content is protected !!