कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरात भर गर्दीत दुचाकी चोरीच्या घटनेनंतर नाथ पै नगर मध्ये बंद घर फोडण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. नाथ पै नगरमधील संजय वाडकर यांच्या बंद घरातील तळमजल्यावरील चार खोल्यांच्या कडी कोयंडा तोडण्याची घटना 19 डिसेंम्बर रोजी रात्री घडली. घटना समजताच पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मुंढे , हवालदार अमित खाडे यांनी घटनास्थळी जात पाहणी केली. घरमालक वाडकर हे कुडाळमध्ये आपल्या नातेवाईकांकडे असतात. घरमालक वाडकर यांनी चोरीला काही गेले नसल्याचे सांगत तक्रार दिली नसल्याची पोलिसांकडून माहिती देण्यात आली.














