कणकवली (प्रतिनिधी) : असलदे मधलीवाडी येथे श्री सत्यनारायण महापुजा व मंदिराचा जिर्णोध्दार वर्धापन दिन सोहळा दि.२५ व २६ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे.त्यानिमित्ताने धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवार २५ डिसेंबर रोजी सायं. ४.३० वा.सत्यनारायण महापुजा,रात्रौ १० वा.स्थानिक भजने,मंगळवार २६ डिसेंबर रोजी सकाळी ९ वा.श्री माऊली देवीचा अभिषेक, दुपारी १२.३० वा.महाआरती,दुपारी १ ते ३ वा.महाप्रसाद,रात्रौ १०.३० वा. श्री बोर्डेकर पारंपारीक दशावतार नाट्यमंडळ मु.पो.दोडामार्ग (सावंतवाडी) यांचा”देव भक्तीला भुकेला” हा नाट्य प्रयोग सादर करण्यात येणार आहे.तरी या कार्यक्रमांना सर्व भक्तांनी उपस्थित रहावे असे आवाहन असलदे मधलीवाडी ग्रामस्थ मंडळींच्या वतीने करण्यात आले आहे.












