साकेडी येथील हजरत दादाशाह यांचा 21, 22 डिसेंबर रोजी उर्स

अहमदनगर येथील शहीद अजमेरी निजामी यांची होणार कव्वाली

कणकवली (प्रतिनिधी) : दर वर्षाप्रमाणे साकेडी मुस्लिमवाडी याठिकाणी हजरत दादाशहा रहिं.यांचा उर्स 21 व 22 डिसेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. 22 डिसेंबर रोजी रात्री 8 ते 10.30 पर्यंत स्नेहभोजन व 9.30 वा. पासून मैफिले सामा (काव्वाली) चा कार्यक्रम होणार आहे. कव्वाल शहीद अजमेरी निजामी अहमदनगर यांची कवाली यावेळी सादर होणार आहे. या कार्यक्रमाच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक व उद्योजक मुदस्सर शिरगावकर उपस्थित राहणार आहेत. या उर्स चा लाभ घ्यावा असे आवाहन उर्स कमिटी साकेडी, हुबरट च्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!