आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

जागतिक महिला दिनी ओसरगावात रंगली पाककला आणि खेळ पैठणीची स्पर्धा

सरपंच सुप्रिया संतोष कदम यांची संकल्पना, आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : ओसरगाव सरपंच श्रीमती सुप्रिया संतोष कदम यांच्या संकल्पनेतून आणि आयोजनातून जागतिक महिला दिनानिमित्त शाळा ओसरगाव-कानसळीच्या भव्य पटांगणावर ‘खेळ पैठणीचा’ व पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला नवनिर्वाचित जि.प.…

राज्यस्तरीय “दिपस्तंभ २०२५” पुरस्कार कॅथॉलिक पतसंस्थेला प्रदान

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन आयोजीत राज्यस्तरीय “दिपस्तंभ २०२५” या पुरस्कराचा मान कॅथॉलिक अर्बन को. ऑप. क्रेडिट सोसा. लि. सावंतवाडी या संस्थेला मिळाला आहे. संपुर्ण कोकण विभागातून सिंधुदुर्ग जिल्हातील हा मान मिळवणारी ही एकमेव संस्था आहे. महाराष्ट्र…

उंबर्डे कुंभारवाडीचे सुपुत्र संदेश तुळसणकर ‘युवा समाज गौरव पुरस्काराने’ सन्मानित

संत गोरा कुंभार समाज उत्कर्ष मंडळ व सिंधुदुर्ग जिल्हा कुंभार समाज समितीचा मानाचा पुरस्कार; सतीश कुंकळीकर यांच्या शुभहस्ते प्रदान वैभववाडी (प्रतिनिधी) : संत गोरा कुंभार समाज उत्कर्ष मंडळ सिंधुदुर्ग व सिंधुदुर्ग जिल्हा कुंभार समाज समिती आयोजित युवा समाज गौरव पुरस्कार…

दारिस्ते गावचे शेतकरी रमले नाटळ च्या काजू बागेत

कणकवली (प्रतिनिधी) : दारिस्ते गावामध्ये हॉर्टसॅप अंतर्गत काजूपीक शेतीशाळा राबविण्यात आली. त्याअंतर्गत दिनांक 09/03/2026 रोजी नाटळ गावचे प्रगतशील शेतकरी नागेश रामचंद्र बोडेकर यांच्या काजू बागेत दारिस्ते गावातील शेतीशाळेतील शेतकऱ्यांना प्रक्षेत्र भेट घडविण्यात आली. यापुर्वी घेतलेल्या हॉर्टसॅप अंतर्गत काजू पिक शेतीशाळेच्या…

काष्ट्राईब कर्मचारी महासंघाची कोकण आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्या दालणात मागासवर्गीय कर्मचारी प्रश्नांवर सहविचार सभा संपन्न

कणकवली (प्रतिनिधी) : सफाई कामगारांच्या किमान वेतन, भविष्य निर्वाह निधी आणि महागाई भत्ता वाढी संदर्भात तसेच विविध प्रश्नांच्या अनुषंगाने कोकण आयुक्तांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना विशेष सूचना दिल्या. कास्ट्राईब कर्मचारी महासंघाची ची सहविचार सभा विभागीय आयुक्त विजय सुर्यवंशी यांच्या दालनात मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या…

जागतिक महिला दिनी 200 महिलांसाठी केरळा स्टोरी 2 सिनेमाचा मोफत शो

पालकमंत्री नितेश राणेंच्या संकल्पनेतून नगरसेविका मेघा गांगण यांचा पुढाकार कणकवली (प्रतिनिधी) : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पालकमंत्री नितेश राणे यांनी महिला आणि मुली यांच्यासाठी केरळा स्टोरी टू या चित्रपटाचे मोफत प्रक्षेपण करण्याचे ठरवले होते. त्यानुसार नगरसेविका मेघा गांगण यांनी पुढाकार…

स्त्री समृद्ध बनली तरच समाज समृद्ध बनेल – डॉ. राजश्री साळुंखे

कणकवली कॉलेजमध्ये महिला दिन उत्साहात संपन्न कणकवली (प्रतिनिधी) : स्त्री समृद्ध बनली तरच समाज समृद्ध बनेल. स्त्री ही मानवी समाजाची खरी उद्धारक आहे. याकरिता आजच्या मुलींनी उच्च शिक्षण घेणे ही काळाची गरज आहे. विशेषत: पालक वर्गाने आपल्या मुलींच्या शिक्षणाकडे सजगपणे…

राष्ट्र सेवा दल मार्फत शिमग्यानिमित्त पर्यावरण जागृतीसाठी पथनाट्य

मोरगाव व आडाळी येथे उत्स्फूर्त प्रतिसाद सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : राष्ट्र सेवा दलाच्या पुढाकाराने शिमग्यानिमित्त दोडामार्ग तालुक्यातील मोरगाव आणि आडाळी येथे पर्यावरणविषयक जनजागृतीसाठी सादर केलेल्या ‘निसर्गदेवाक शबय’ या आगळ्यावेगळ्या पथनाट्याला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. राष्ट्र सेवा दल, अनुभव शिक्षा केंद्र, रानमाणूस…

शासनाच्या योजनांचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा – तहसीलदार गणेश लव्हे

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान (टप्पा 1) चौके येथे शुभारंभ आंबेरी मंडळ पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा उस्फुर्त प्रतिसाद उपजिल्हाधिकारी नितीन राऊत यांची प्रमुख उपस्थिती चौके (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभाग व वन विभाग यांच्या वतीने राज्यात छत्रपती शिवाजी महाराज…

खांबळेच्या नीलम जाधव यांना राज्यस्तरीय महिला गौरव पुरस्कार

वैभववाडी (प्रतिनिधी) : खांबळे गावच्या कन्या सामाजिक कार्यकर्त्या नीलम जाधव यांचा राज्य स्तरीय महिला गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. महिला दिनानिमित्त रवींद्र नाट्यगृह मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र राज्य महिला…

error: Content is protected !!