छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान (टप्पा 1) चौके येथे शुभारंभ
आंबेरी मंडळ पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा उस्फुर्त प्रतिसाद
उपजिल्हाधिकारी नितीन राऊत यांची प्रमुख उपस्थिती
चौके (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभाग व वन विभाग यांच्या वतीने राज्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरांच्या आयोजन ठिकठिकाणी करण्यात आले आहे याच अनुषंगाने या शिबिराचा पहिला टप्पा मालवण तालुक्यातील आंबेरी मंडळ विभागात चौके भ.ता चव्हाण महाविद्यालय येथे मालवण तहसीलदार गणेश लव्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी उपजिल्हा अधिकारी नितीन राऊत, वायरी भुतनाथ जि.प सदस्य अक्षता गावडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजा गावडे, गटविकास अधिकारी शाम चव्हाण, चौके हायस्कूल स्थानिक समिती अध्यक्ष बिजेंद्र गावडे, निवासी नायब तहसीलदार विनायक जांभेकर, जिल्हा विस्तार अधिकारी शिंगाडे, संजय गांधी शाखा प्रिया हर्णे ग्राम महसूल नायब तहसीलदार नीलिमा प्रभुदेसाई, तलाठी संघटना अध्यक्ष अजय परब,पंचायत समिती विस्तार अधिकारी,वैद्यकीय अधिकारी कुबेर मिठारी, चौके सरपंच पी. के. चौकेकर, नांदरुख सरपंच रामचंद्र चव्हाण, आंबेरी सरपंच मनमोहन डीचोलकर, आमडोस सरपंच सुबोधिनी परब, आनंदव्हाळ सरपंच रश्मी टेबुलकर,साळेल सरपंच रवींद्र साळकर, काळसे सरपंच विशाखा काळसेकर,धामापूर सरपंच मानसी परब, कुणकावळे सरपंच मंदार वराडकर, देवली सरपंच श्याम वाक्कर, चौके हायस्कूल मुख्याध्यापक रसिका गोसावी, सामाजिक कार्यकर्ते दत्ता गावडे, पापा माडलकर उपस्थित होते.
यावेळी महसूल विभाग कृषी विभाग आरोग्य विभाग या विभागांचे प्रमुख अधिकारी यांनी आपापल्या विभागात चालू असलेल्या महाराष्ट्र राज्य सरकारच्या योजनांची माहिती उपस्थित आंबेरी मंडळ अंतर्गत पंचक्रोशीतील उपस्थित ग्रामस्थांना दिली. यावेळी मालवण तहसीलदार गणेश लव्हे यांनी मार्गदर्शन करताना उपस्थित लाभार्थी तसेच ग्रामस्थ यांना शासनाच्या विविध योजनांचा शंभर टक्के लाभ घेता यावा यासाठी शासनाने या शिबिराचा उपक्रम आपल्या गावात आणला आहे. शासकीय योजनांचा लाभ घेत आपला विकास आपल्या गावचा विकास आणि त्यानंतर आपल्या देशाचा विकासास आपण हाथभार लावायचा आहे. शासकीय योजना तसेच वेगवेगळ्या दाखल्यांसाठी लाभार्थ्यानी वेळीच कागदपत्रांची पूर्तता केली तर आमच्या सर्व विभागांकडून सहकार्य मिळेल असे सांगितले.
याप्रसंगी उपजिल्हाधिकारी नितीन राऊत, चौके वैद्यकीय अधिकारी कुबेर मिठारी, तालुका कृषी अधिकारी धनंजय गावडे, निवासी नायब तहसीलदार विनायक जांभेकर, चौके सरपंच पी के चौकेकर, आंबोडस सरपंच सुबोधिनी परब, विस्तार अधिकारी मालवण पंचायत समिती यांनी मार्गदर्शन केले. या शिबिराप्रसंगी प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत नऊ मंजूर लाभार्थी यांच्याकडे उपस्थित मान्यवर यांच्याकडून घरकुलाच्या चाव्या देण्यात आल्या. राज्य कृषी योजनेअंतर्गत पाच लाभार्थ्याला कृषी साहित्य वाटप करण्यात आले. कुळवहिवाट शाखा अंतर्गत चार लाभार्थ्यांचे प्रकरणे मंजूर करण्यात आली. संजय गांधी निराधार दिव्यांग दोन प्रकरणे मंजूर करण्यात आली श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्त योजना अंतर्गत तीन प्रकरणे मंजूर करण्यात आली, पुरवठा शाखा अंतर्गत तीन लाभार्थ्यांना शिधापत्रिका, आयुष्यमान कार्ड वाटप करण्यात आले.
या छत्रपती शिवाजी महाराज महाराज महाराजस्व शिबिरात महसूल विभाग, महसूल पुरवठा शाखा, महसूल ई सेवा केंद्र, आरोग्य विभाग, कृषी विभाग यांचे मार्गदर्शक स्टॉल लावण्यात आले होते. या संपूर्ण शिबिराचे नियोजन आंबेरी मंडल अधिकारी सुदर्शन अलकुरे तसेच त्यांचे सहकारी महसूल अधिकारी पी जे गुरव यांनी केले. यावेळी मालवण महसूल विभागाचे सर्व अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चौके हायस्कूल चे शिक्षक दत्तप्रसाद परुळेकर यांनी केले.











