कणकवली (प्रतिनिधी) : सफाई कामगारांच्या किमान वेतन, भविष्य निर्वाह निधी आणि महागाई भत्ता वाढी संदर्भात तसेच विविध प्रश्नांच्या अनुषंगाने कोकण आयुक्तांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना विशेष सूचना दिल्या.
कास्ट्राईब कर्मचारी महासंघाची ची सहविचार सभा विभागीय आयुक्त विजय सुर्यवंशी यांच्या दालनात मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर बैठक आयोजित केली होती सदर बैठकीमध्ये नगरपंचायत, नगरपरिषद, ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागाच्या सफाई कामगारांना किमान वेतन, भविष्य निर्वाह निधी आणि महागाई भत्ता वाढ करण्यासंदर्भात अनियमित्ता दिसून येत असल्याचे कास्ट्राईब संघटनेच्या वतीने सांगण्यात आले याबाबत जिल्हाधिकारी स्तरावर विशेष सभा घेऊन सफाई कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी कोकण आयुक्त स्तरावरुन जिल्हाधिकाऱ्यांना निर्देशित करण्यात आले.
तसेच SC, ST प्रवर्गाच्या कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीमध्ये आरक्षण बाबत जिल्हावार आढावा घेण्यात आला. तसेच जुनी पेन्शन योजना लागू करणे, मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचा अनुशेष भरणे, अनुकंपा पद भरती च्या सद्यस्थिती बाबत जिल्हावार वस्तुस्थिती दर्शक माहिती सांगुन अनुकंपा भरती प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्यासाठी कोकण आयुक्त यांनी सर्व जिल्हाधिकारी यांना सुचना दिल्या, तसेच कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या पदाधिकारी यांना सोयीच्या ठिकाणी बदली बाबत शासन परिपत्रकाप्रमाणे मुख्यालयी ठिकाण देण्याबाबत विचार करावा असे सांगण्यात आले. मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना दिनांक ३ डिसेंबर १९८० च्या शासन निर्णयानुसार मागासवर्गिय कक्ष व इतर कार्यकारी पदावर नियुक्ती करणे साठी कार्यवाही करण्यास सांगण्यात आले. तसेच मागासवर्गिय कर्मचाऱ्यांच्या निवासस्थाना साठी जागेची मागणी कास्ट्राईब संघटने मार्फत करण्यात आली असता कोकण विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना शासन निर्णया प्रमाणे मागासवर्गिय गृहनिर्माण संस्थांना जागा देण्याबाबत कोकण आयुक्तांनी निर्देशित केले. तसेच अधिसंख्य पदावर वर्ग केलेल्या कर्मचाऱ्यांच्या पदावर ज्याचा अधिकार होता त्याला त्या जागेवर नेमणूक देणे बाबत सर्व अधिकाऱ्यांना सांगण्यात आले , शाळा प्रवेश प्रक्रिया सुलभ व्हावी तसेच शालेय शिक्षणा पासुन मुले वंचित राहु नयेत या करिता अति दुर्गम भागातील मागासवर्गिय मुलांना आधारकार्ड देणे बाबत शासन स्तरावरून विशेष मोहिम राबवुन प्रयत्न करण्या बाबत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कोकण आयुक्त यांनी सुचित केले. सभेस सिंधुदुर्ग जिल्हाधिकरी तृप्ती धोंडमिसे यांच्यासह कोकण विभागातील सर्व जिल्हाधिकारी उपस्थित होते. तसेच कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे राज्यमहासचिव सुरेश तांबे, राज्य कार्याध्यक्ष गणेश मडावी, वरिष्ठ उपाध्यक्ष सुमित भुईगळ, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष समाजभुषण संदीप कदम, दिव्यांग कर्मचारी संघटनेचे शिवाजी बीबराळे, कोकण विभागीय शिक्षक संघटनेचे अध्यक्ष गाडे, संजीव मोरे रायगड महासंघ , जिल्हाध्यक्ष राहुल सूर्यवंशी महसूल विभाग, रायगड अध्यक्ष, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष संतोष कांबळे, ठाणे जिल्ह्याचे शिक्षक संघटनेचे अध्यक्ष विजय जाधव व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. शेवटी आभार विजय जाधव यांनी व्यक्त केले.













