सरपंच सुप्रिया संतोष कदम यांची संकल्पना, आयोजन
कणकवली (प्रतिनिधी) : ओसरगाव सरपंच श्रीमती सुप्रिया संतोष कदम यांच्या संकल्पनेतून आणि आयोजनातून जागतिक महिला दिनानिमित्त शाळा ओसरगाव-कानसळीच्या भव्य पटांगणावर ‘खेळ पैठणीचा’ व पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला नवनिर्वाचित जि.प. सदस्या शितल दळवी व पंचायत समिती सदस्या अक्षता राणे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. तसेच ग्रामपंचायत सदस्या वंदना पारकर, दुर्वा शिंदे, रिया नाईक, पोलिस पाटील संजना आंगणे तसेच कानसळी शाळेचे शिक्षक उपस्थित होते. यावेळी मान्यवरांचा शाल-श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
खेळ पैठणीचा स्पर्धेचा निकाल :
प्रथम – प्रतीक्षा प्रदीप चौकेकर
द्वितीय – जान्हवी जयेंद्र राणे
तृतीय – युक्ता योगेश जंगम
पाककला स्पर्धेचा निकाल :
प्रथम – भारती भरत आंगणे (चविष्ट थालिपीठ)
द्वितीय – श्वेता राणे (गुळ पापडी)
तृतीय – त्रिशा गणेश मोरे (नाचणी मिल्कशेक)
उत्तेजनार्थ – वैष्णवी परब (नाचणी-खजूर केक)
‘खेळ पैठणीचा’ स्पर्धेत प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास महापैठणी, द्वितीय क्रमांकास सेमी पैठणी तर तृतीय क्रमांकास पैठणी साडी देऊन गौरविण्यात आले. तर पाककला स्पर्धेत प्रथम क्रमांकास कुकर, द्वितीय क्रमांकास थर्मास आणि तृतीय क्रमांकास नॉनस्टिक कढई देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत कार्यक्रम यशस्वी केला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपसरपंच गुरुदास सावंत, उद्योजक संतोष कदम, शाळेचे मुख्याध्यापक विलास गोसावी तसेच ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले.












