खांबळेच्या नीलम जाधव यांना राज्यस्तरीय महिला गौरव पुरस्कार

वैभववाडी (प्रतिनिधी) : खांबळे गावच्या कन्या सामाजिक कार्यकर्त्या नीलम जाधव यांचा राज्य स्तरीय महिला गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. महिला दिनानिमित्त रवींद्र नाट्यगृह मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या कल्याणासाठी आणि सक्षमीकरणासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

राज्य महिला आयोग,अध्यक्षा रुपाली चाकणकर,  महाराष्ट्र राज्य विधान परिषद सदस्य सौ. मनिषा कायंदे  यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.नीलम जाधव या  एस डब्ल्यू झालेल्या सामाजिक कार्यकर्त्यां आहेत. त्या ऊर्जा या संस्थेत काम करीत आहेत.वैभववाडी तालूका बौध्द सेवा संघांचे माजी उपाध्यक्ष भगवान कांबळे यांच्या त्या कन्या आहेत. त्यांना मिळालेल्या पुरस्कारामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

error: Content is protected !!