आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी आई अंबाबाईची गजारूढ पूजा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी आई अंबाबाईची गजारूढ पूजा साकारण्यात आली आहे. करवीर महात्म्यातील कथेप्रमाणे अश्विन शुद्ध पंचमीला कोल्हासूर वध करताना आई अंबाबाईने कोल्हासुराला वरदान दिले होते की या नगरीला तुझे नाव राहील. दरवर्षी तुझ्या नावाने #कोहळा बळी…

भाजपा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोर्चा व आघाड्यांचे जिल्हाध्यक्ष जाहीर

ओरोस (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी रचना पूर्ण झाल्यानंतर भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी भाजपा विविध मोर्चा व आघाड्यांचे जिल्हाध्यक्ष, जिल्हा संयोजक यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक रचना पूर्ण करताना…

“गरज तिथे धीरज ” ; अपघातग्रस्त गंभीर जखमी करीता धीरज परब उतरले रस्त्यावर……

कुडाळ (प्रतिनिधी) : येथील पंडित हाॅस्पिटल समोर काल झालेल्या अपघातात गंभीर जखमी पेशंटला पुढील उपचारासाठी नेताना,सरकारी हाॅस्पिटल समोर अपघातातील वाहनांमुळे जिजामाता चौक ते पोलीस स्टेशन पर्यंत मोठे ट्राफिक झाले होते.या दरम्यान अपघातग्रस्ताची विचारपूस करण्यासाठी आलेल्या मनसे जिल्हाध्यक्ष परब यांनी स्वतः…

सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या सुमती भास्कर राणे यांचे दुःखद निधन !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट- पटेलवाडी येथे माहेरी असलेल्या श्रीमती सुमती भास्कर राणे (वय ९२ वर्षे ) यांचे शुक्रवारी २६- ९- २५रोजी दुपारी चार वाजता वृद्धापकाळमुळे दुःखद निधन झाले. फोंडाघाट येथील सुप्रसिद्ध गणेश मूर्तिकार खेमा भोज सावंत- पटेल यांच्या त्या ज्येष्ठ…

झुंझार मित्र मंडळ खारेपाटण आयोजित रक्तदान शिबिरात ५२ रक्तदात्यांनी केले रक्तदान ; रक्तदान शिबिराचे सलग 33 वर्षे यशस्वी आयोजन

55 नागरिकांनी स्वेच्छेने अवयवदान अर्ज केले दाखल कै. वीणा ब्रम्हदंडे यांचे मरणोत्तर अवयवदान ; कै. वीणा यांच्या नातू मुलाचा विशेष सत्कार खारेपाटण (प्रतिनिधी) : झुंझार मित्र मंडळ खारेपाटण व सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान शाखा कणकवली तसेच खारेपाटण कला वाणिज्य व विज्ञान…

फोंडाघाट मध्ये रविवारी श्रीदुर्गामाता दौड चे आयोजन! सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : हिंदू शक्तीचे विश्वदर्शन घडवणारी श्री दुर्गामाता दौड रविवार दिनांक 28 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी ठीक साडेसात वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, कुळाची वाडी– मारुती वाडी– राधाकृष्ण मंदिर फोंडाघाट मार्गावर निघणार आहे.शिवशंभो सामाजिक कला क्रीडा मंडळ ,फोंडाघाट आणि…

तरुण पिढीने सहकारात उतरावे; रोजगार निर्मितीची मोठी संधी – पालकमंत्री नितेश राणे

शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसाय निर्माण करावा – जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी सिंधू वैभव फार्मर प्रोड्युसर कंपनीकडून पाचशे शेतकऱ्यांना शेअर प्रमाणपत्रांचे वाटप वैभववाडी (प्रतिनिधी) : कोकणात आर्थिक समृद्धी आणायची असेल तर सहकार हे प्रभावी माध्यम आहे. पश्चिम महाराष्ट्र प्रमाणे जिल्ह्यात सहकाराचे…

आमदार निलेश राणे यांच्या यशस्वी मध्यस्थीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामरोजगार सहाय्यक कामबंद आंदोलन मागे

आचरा (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मनरेगा विभागातील ग्रामपंचायतमध्ये काम करत असलेल्या ग्रामरोजगार सहाय्यक संघटनेचे मागील एक वर्षांपूर्वी झालेल्या शासन निर्णय दिनांक 3 ऑक्टोबर, 2024 नुसार मासिक फिक्स 8000 मानधन वैयक्तिक खात्यात अद्याप मिळाले नसल्याने संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील ग्रामरोजगार सहाय्यक संघटनेतर्फे…

प्रा. आ. केंद्र वरवडे अंतर्गत “स्वस्थ नारी सशक्त परिवार” अभियानाचा शुभारंभ

१४५ नागरिकांच्या आरोग्याची करण्यात आली मोफत तपासणी कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील वरवडे प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत शुक्रवार दि. २६ सप्टेंबर २०२५ रोजी “स्वस्थ नारी सशक्त परिवार” अभियानाचा शुभारंभ सरपंच करुणा घाडीगांवकर यांच्या हस्ते वरवडे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे करण्यात…

‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ अभियानांतर्गत कणकवली येथे मोफत वैद्यकीय व दंतरोग शिबिराचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनामार्फत १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत “स्वस्थ नारी, सशक्त परिवार” अभियानांतर्गत सेवा पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे. याअंतर्गत वैद्यकीय व दंतरोग तपासणी शिबिराचे आयोजन उपजिल्हा रुग्णालय, कणकवली येथे करण्यात आले आहे.…

error: Content is protected !!