फोंडाघाट मध्ये रविवारी श्रीदुर्गामाता दौड चे आयोजन! सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : हिंदू शक्तीचे विश्वदर्शन घडवणारी श्री दुर्गामाता दौड रविवार दिनांक 28 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी ठीक साडेसात वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, कुळाची वाडी– मारुती वाडी– राधाकृष्ण मंदिर फोंडाघाट मार्गावर निघणार आहे.शिवशंभो सामाजिक कला क्रीडा मंडळ ,फोंडाघाट आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने निघणाऱ्या या श्री दुर्गामाता दौडी मध्ये सर्वांनी सहभागी व्हावे,असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आलेले आहे…

शिवशंभो सामाजिक कला- क्रीडा मंडळ, फोंडाघाट आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील आधारित शिवभूषण या काव्याचे विशेष सादरीकरण २८ सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजता कुळदेव मंदिर, कुळाची वाडी, फोंडाघाट येथे होणार आहे. कवी भूषण यांनी रचलेल्या या काव्याचे छंदात्मक सादरीकरण मालवण येथील श्री.भूषण साटम करणार आहेत अधिक माहितीसाठी अशोक लाड (७२६३९८३०८१) किंवा अक्षय धुरी,प्रकाश कातरुड यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!