प्रा. आ. केंद्र वरवडे अंतर्गत “स्वस्थ नारी सशक्त परिवार” अभियानाचा शुभारंभ

१४५ नागरिकांच्या आरोग्याची करण्यात आली मोफत तपासणी

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील वरवडे प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत शुक्रवार दि. २६ सप्टेंबर २०२५ रोजी “स्वस्थ नारी सशक्त परिवार” अभियानाचा शुभारंभ सरपंच करुणा घाडीगांवकर यांच्या हस्ते वरवडे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे करण्यात आला. भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या वतीने दि. १७ सप्टेंबर २०२५ ते दि. २ ऑक्टोंबर २०२५ या कालावधीत सेवा पंधरवडा जाहीर करण्यात आला असून यादरम्यान गावातील महिला आरोग्य दृष्टीने निरोगी व सक्षम राहिल्या पाहिजेत तर देश सक्षम होईल हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन हा उपक्रम स्थानिक ग्रामपंचायत व आरोग्य विभागाच्या वतीने संपूर्ण राज्यभर राबविला जात आहे. प्रा. आ. केंद्र वरवडे अंतर्गत स्वस्थ नारी सशक्त परिवार घेण्यात आलेल्या अभियान कॅम्प मध्ये १४५ रुग्णांची तपासणी करण्यात आली.

यावेळी डॉ. स्वप्नाली वळंजू , ग्रामपंचायत अधिकारी प्रफुल्ल धुरी, तसेच अन्य शासकीय कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित रुग्णांची X-ray – १०५, ECG – ६०, HB तपासणी – ८७, नेत्र तपासणी – १०६, मोतीबिंदू – ६, TD लसीकरण – ७९, PMJY – ६०, वयवंदना – ३०, आभा कार्ड – १५ अश्या संख्येने लाभ घेण्यात आला.

तसेच अंगणवाडी सेविका यांच्या मार्फत ॲनिमिया मुक्त भारत – वेगवेगळ्या पाककृती प्रदर्शन ठेवण्यात आले. गरोदर माता आणि किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन एका छोटया पथनाट्याद्वारे करण्यात आले. या अभियानात आरोग्य तपासणी बरोबर नागरिकांचे ABHA कार्ड व PMJAY कार्ड काढून देण्यात येत आहेत.

तर NCD screening करणे, गरोदरमाता तपासणी, लसीकरण करणे, समुपदेशन व MCP Card वाटप करणे, समतोल आहार प्रदर्शन व संशयित क्षय रुग्ण थुंकी तपासणी तसेच फिजिओथेरपी मार्गदर्शन, HLL lab मार्फत रक्त तपासण्या व मोफत किरकोळ औषधे वाटप करणे आदी उपक्रम राबविण्यात आले.

error: Content is protected !!