आमदार निलेश राणे यांच्या यशस्वी मध्यस्थीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामरोजगार सहाय्यक कामबंद आंदोलन मागे

आचरा (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मनरेगा विभागातील ग्रामपंचायतमध्ये काम करत असलेल्या ग्रामरोजगार सहाय्यक संघटनेचे मागील एक वर्षांपूर्वी झालेल्या शासन निर्णय दिनांक 3 ऑक्टोबर, 2024 नुसार मासिक फिक्स 8000 मानधन वैयक्तिक खात्यात अद्याप मिळाले नसल्याने संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील ग्रामरोजगार सहाय्यक संघटनेतर्फे कामबंद आंदोलन सुरू आहे. परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ मालवण आमदार निलेश नारायण राणे यांनी आज ग्रामरोजगार सहाय्यक संघटनेच्या शिष्टमंडळा सोबत चर्चा करून ग्रामरोजगार सहाय्यक यांचे प्रश्न व समस्या तात्काळ या योजनेचे रोहयोमंत्री भरत गोगावले यांच्याशी संपर्क साधून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामरोजगार सहाय्यक यांचे प्रलंबित असलेले मानधन तात्काळ देण्यात यावे तसेच मजुरांची मजुरी साहित्याची रक्कम असा प्रलंबित निधी देखील दोन दिवसात देण्याची मागणी केली. तसेच फिक्स मानधन बाबत देखील लवकरच मंत्रालय मध्ये मनरेगा बाबत माहिती घेवून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आपले प्रश्न व समस्या सोडविण्याची जबाबदारी व खात्री दिली असून सध्या सुरू असलेले कामबंद आंदोलन मागे घेण्यात यावे असे आवाहन केले. त्यामुळे आमदार निलेश राणे यांच्या सूचनेवरून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामरोजगार सहाय्यक संघटनेचे कामबंद आंदोलन मागे घेत आहोत, अशी माहिती मालवण ग्रारोसे तालुकाध्यक्ष दिंगबर जाधव यांनी दिली. या वेळी बहुसंख्य ग्राम रोजगार सहाय्यक उपस्थित होते. आमदार निलेश राणे यांच्या यशस्वी मध्यस्थीबद्दल ग्रामरोजगार सहाय्यक जिल्हा सचिव विष्णू माणगांवकर, मालवण तालुकाध्यक्ष दिंगबर जाधव यांनी आभार मानले आहेत.

error: Content is protected !!