“गरज तिथे धीरज ” ; अपघातग्रस्त गंभीर जखमी करीता धीरज परब उतरले रस्त्यावर……

कुडाळ (प्रतिनिधी) : येथील पंडित हाॅस्पिटल समोर काल झालेल्या अपघातात गंभीर जखमी पेशंटला पुढील उपचारासाठी नेताना,सरकारी हाॅस्पिटल समोर अपघातातील वाहनांमुळे जिजामाता चौक ते पोलीस स्टेशन पर्यंत मोठे ट्राफिक झाले होते.या दरम्यान अपघातग्रस्ताची विचारपूस करण्यासाठी आलेल्या मनसे जिल्हाध्यक्ष परब यांनी स्वतः रस्त्यावर उतरून अॅम्ब्युलन्ससाठी वाहतुकीतून वाट काढून दिली. नेहमीच सामाजिक विषयात संवेदनशील असलेल्या परब यांनी पुन्हा एकदा “गरज तिथे धीरज ” हे वाक्य साजेल असे काम केल्याचे काल उपस्थितांकडुन बोलले जात हाेते.

error: Content is protected !!