सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या सुमती भास्कर राणे यांचे दुःखद निधन !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट- पटेलवाडी येथे माहेरी असलेल्या श्रीमती सुमती भास्कर राणे (वय ९२ वर्षे ) यांचे शुक्रवारी २६- ९- २५रोजी दुपारी चार वाजता वृद्धापकाळमुळे दुःखद निधन झाले. फोंडाघाट येथील सुप्रसिद्ध गणेश मूर्तिकार खेमा भोज सावंत- पटेल यांच्या त्या ज्येष्ठ कन्या होत्या. त्यांचा विवाह असुरंडी- टेंबवाडी

येथील मुंबई येथील पोलीस शिपाई, स्वर्गीय भास्कर राणे यांच्याशी झाला होता. परंतु वर्षभरात कर्तव्य बजावत असताना पतीच्या अपघाती निधनानंतर दुःखद प्रसंगातून सावरत असुरंडी मध्ये त्यांनी समाजकार्यात वाहून घेतले. त्यावेळी असुरंडी सारख्या ग्रामीण भागात बदलून आलेले डॉक्टर,शिक्षक, पोस्टमन, तलाठी, ग्रामसेवक, किंबहुना विद्यार्थ्यांची यांनी राहण्याची जेवणाची आपल्या मोठ्या घरी सोय केली…

शेवटच्या दिवसात फोंडाघाट मधील तिचा भाचा प्रकाश भालचंद्र सावंत – पटेल या उभयतांनी तिची सेवा केली. तिच्या पश्चात भाऊ, भावजय ,भाचे,भाच्या, नातवंडे असा मोठा परिवार आहे.आयुष्यात दुःखद प्रसंगांना न घाबरता जनसेवा करत सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या नवदुर्गा स्व.सुमती हीच्या निधनाबद्दल सर्वत्र दुःख व्यक्त होत आहे….

error: Content is protected !!