आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

पारंपारिक गोमू नृत्याच्या कलेला फोंडावासीयांकडून भरभरून दाद!

फोंडाघाट – लोरे- हेळेवाडीतील युवाई कडून ही कला यापुर्वी चार-पाच वर्षे आणि यापुढेही जिवंत ठेवण्याचा विश्वास— फोंडाघाट (प्रतिनिधी) : होळीच्या सणाची धामधुम विशेषता कोकणामध्ये जास्त प्रमाणात पहावयास मिळते. त्यासाठी गावातील वाड्यावर चाकरमानी मोठ्या संख्येने येतात. होळी तोडण्यापासून ते नाचवण्यापर्यंत, त्यानंतर…

शिरगाव हायस्कूलचा विद्यार्थी कार्तिक चौकेकर याची ISRO अभ्यास दौऱ्यासाठी निवड 

देवगड (प्रतिनिधी) : तालुक्यातील शिरगाव हायस्कूल, शिरगाव येथील इयत्ता ९ वी अ मधील विद्यार्थी कार्तिक महेश चौकेकर यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे. सन २०२२-२३ मध्ये जि. प सिंधुदुर्ग यांच्या तर्फे घेण्यात आलेल्या “सिंधुदुर्ग जिल्हा…

खारेपाटण सह पंचक्रोशीत गवा रेड्यांचा धुमाकूळ

बागायती शेतीचे नुकसान खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण गावा सह पंचक्रोशीत सद्या रानटी गवा रेड्यानी धुमाकूळ घातला असून सदर गवे रेडे हे बागायती शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत. यामुळे पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये सद्या भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत अधिक…

रविंद्र खेबुडकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा स्विकारला पदभार

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रविंद्र खेबुडकर यांनी आज पदभार स्वीकारला. सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी शासन अनेक महत्वाकांक्षी योजना राबवित असते. या महत्वाकांक्षी योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. पालकमंत्री नितेश राणे…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी केले स्वागत

रत्नागिरी (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे हे सोमवार १७ मार्च रोजी रत्नागिरी दौऱ्यावर आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी जिल्हा सरचिटणीस…

शिष्यवृत्ती परीक्षेतून उद्याचे शासकीय अधिकारी घडतील – मुख्याधिकारी गौरी पाटील

कणकवली (प्रतिनिधी) : प.पू. भालचंद्र महाराज संस्थानाच्या शैक्षणिक मंडळाचा शिष्यवृत्ती सराव परीक्षा घेण्याचा उपक्रम स्तुत्य आहे. या परीक्षेतील टाॅपर शासकीय परीक्षेतही टाॅपर असतात, ही बाब अभिमानास्पद आहे. शिष्यवृत्ती सराव परीक्षेत यश संपादन केलेले विद्यार्थी भविष्यात शासकीय अधिकारी बनलेले दिसतील, असा…

संत रविदास भवनाच्या माध्यमातून चर्मकार समाजाची आणखी उन्नती होईल- वैभव नाईक

वाडी हुमरमळा येथे संत रविदास भवन इमारतीचे मा. आम. वैभव नाईक यांच्या हस्ते झाले उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाच्या वतीने वैभव नाईक यांचा सत्कार कणकवली (प्रतिनिधी) : कुडाळ तालुक्यातील वाडी हुमरमळा येथे सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ…

नीलकमल बोट अपघात प्रकरणी चौकशी अहवालानंतर दोषींवर कठोर कारवाई

मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची विधान परिषदेत ग्वाही मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील नीलकमल बोटीच्या अपघातात १५ जणांचा मृत्यू झाल्याबाबत नौदल विभागाकडून सदर अपघाताची स्वतंत्र चौकशी करण्यात येत असून याप्रकरणी मुख्य बंदर अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली देखील चौकशी…

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कणकवली येथे तिथीप्रमाणे शिवजयंती उत्साहात साजरी

वेशभूषा स्पर्धा, शिवकालीन खेळ व ढोल ताश्यांच्या गजरात, शोभायात्रेचे आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आणि कणकवली शहर शिवसेनेच्या पुढाकाराने कणकवली शिवसेना शाखेसमोर तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी माजी आमदार वैभव नाईक, माजी…

शासकीय तंत्रनिकेतन मालवण येथील योग शिबिरास प्रतिसाद !

मसूरे (प्रतिनिधी) : निरोगी निरामय शरीरासाठी तसेच उत्तम आरोग्यासाठी शासकीय तंत्रनिकेतन मालवण येथे नुकतेच योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नॅशनल योगा ॲथलेटिक खेळाडू योगशिक्षिका निकिता लाड यांनी योगाचे विविध प्रकार व आसने यावेळी प्रत्यक्षिका सह दाखविली. यावेळी कॉलेजचे टी.व्ही…

error: Content is protected !!