खारेपाटण सह पंचक्रोशीत गवा रेड्यांचा धुमाकूळ

बागायती शेतीचे नुकसान

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण गावा सह पंचक्रोशीत सद्या रानटी गवा रेड्यानी धुमाकूळ घातला असून सदर गवे रेडे हे बागायती शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत. यामुळे पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये सद्या भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत अधिक वृत्त असे की, खारेपाटण पंचक्रोशीतील काही गावांमध्ये सद्या रानटी गवा रेड्यांचा एक मोठा कळप जंगल भागात फिरत असून काही दिवसापूर्वी हे गवे रेडे खारेपाटण येथील दुर्गादेवी मंदिरच्या मागील माळरानावर स्थानिक नागरिकांना आढळून आले.तर मागील आठवड्यात सदर गवे रेडे शेर्पे या गावात उसाच्या शेतात फिरताना आढळले. येथील स्थानिक शेतकऱ्यांच्या उसाची गवा रेड्यानी मोठ्या प्रमाणात नासधूस केली. तसेच रविवारी सदर गवे रेडे खारेपाटण पासून जवळ असलेल्या नडगिवे गावात कुणकवन रोडला शिक्षण कॉलनी येथे आंबा बागेत नागरिकांना दिसले. येथील बागेतील नवीन रोपे तसेच मोहर आलेली व आंबा फळे लागलेल्या कलम झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. तरी यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून संबधीत वन विभगाने या जंगली गवा रेड्याचा तबोडतोब बंदोबस्त करून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान वाचवावे अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिक व शेतकऱ्याकडून केली जात आहे.

error: Content is protected !!