वेशभूषा स्पर्धा, शिवकालीन खेळ व ढोल ताश्यांच्या गजरात, शोभायात्रेचे आयोजन
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आणि कणकवली शहर शिवसेनेच्या पुढाकाराने कणकवली शिवसेना शाखेसमोर तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार परशुराम उपरकर, माजी आमदार राजन तेली, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, विधानसभा प्रमुख सतीश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवपुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. शिवरायांवर आधारित लहान मुलांची वेशभूषा स्पर्धा संपन्न झाली. या वेशभूषा स्पर्धेस उस्फुर्त असा प्रतिसाद मिळाला. एकूण 52 स्पर्धकांनी शिवरायांवर आधारित वेशभूषा साकारली होती. या वेशभूषा स्पर्धेत प्रथम क्रमांक – कु.उत्तम श्रीकृष्ण कोंडूसकर (वेंगुर्ला ) द्वितीय क्रमांक – कु. समर्थ केतन घाडी. तृतीय क्रमांक – कु.प्राजक्ता सुरेश कदम, उत्तेजनार्थ 1) विहान कुणाल तेंडुलकर.2) मिहीर काणेकर 3) शनया गुलाबहुसेन धारवडकर यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. त्यानंतर पटवर्धन चौकापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. त्यामध्ये शिवकालीन खेळांचे प्रात्यक्षिक करण्यात आले.
यावेळी तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, प्रथमेश सावंत,रुपेश नार्वेकर, राजू शेटये, राजू राठोड,युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके, महेश कोदे,तेजस राणे, अजित काणेकर,आबू मेस्त्री, योगेश मुंज,जयेश धुमाळे,तात्या निकम,वैद्येही गुडेकर, दिव्या साळगावकर, माधवी दळवी,संजना कोलते,साक्षी आमडोस्कर,धनस्त्री मेस्त्री, रोहिणी पिळणकर, मीनल म्हसकर,प्रतीक्षा साटम, अर्पिता परब, भालचंद्र दळवी, मुकेश सावंत, सी.आर. चव्हाण, गोट्या कोळसुलकर, समीर परब,संदीप घाडीगावकर, मिलिंद आईर आदींसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


