फोंडाघाट – लोरे- हेळेवाडीतील युवाई कडून ही कला यापुर्वी चार-पाच वर्षे आणि यापुढेही जिवंत ठेवण्याचा विश्वास—
फोंडाघाट (प्रतिनिधी) : होळीच्या सणाची धामधुम विशेषता कोकणामध्ये जास्त प्रमाणात पहावयास मिळते. त्यासाठी गावातील वाड्यावर चाकरमानी मोठ्या संख्येने येतात. होळी तोडण्यापासून ते नाचवण्यापर्यंत, त्यानंतर ती उभी करून पूजाअर्चा,विविध कार्यक्रम, पारंपारिक खेळे, गोमूचे नाच, दशावतारी नाटक,भजने आणि जागवणाऱ्या रात्रीतून आपली सेवा पाच दिवस रुजू करतात. आता दिवसांप्रमाणे सण साजरे करण्याच्या व्याख्याही बदलल्या आहेत.मात्र पारंपारिक प्रथामध्ये अबाल वृद्ध, जाणते बुजुर्ग आणि युवाई मोठ्या उत्साहात होलिकोत्सव साजरा करताना दिसतात.
अर्थात यामध्ये युवा- कॉलेजहा शालेय मुले मागे नाहीत.सलवार- कुर्ता घातलेली आधुनिक गोमू, आपले सवंगडी ढोलकी सम्राट टाळ सम्राट यांच्या साथीने आपल्या होळीला नमन करून *गोमू लग्न केव्हा करणार–*
*प्रेम आहे तुझ्यावर–* अशा जुन्या लोकगीतांना आधुनिक गाण्यांचा बाज देऊन लोकांचे लक्ष वेधून घेतात. असाच आधुनिक गोमू- देवांश भोसले, ढोलकी – आयुष आग्रे, टाळ- आवेश आग्रे अन् गायक – कुणाल नाचणेकर यांचा फोंडाघाट- लोरे- हेळेवाडी येथील युवा ग्रुपने फोंडाघाट बाजारपेठेचे मनोरंजन केले. आणि अजूनही ही लोककला जिवंत असल्याचे दर्शन घडविले. त्यांच्या ह्या कलाकारीला फोंडा पेठे तील व्यापाऱ्यांनी भरभरून दाद दिली…











